Cotton Purchase to be bought from Parbhani on Monday
Cotton Purchase to be bought from Parbhani on Monday 
मुख्य बातम्या

परभणीत 'पणन'र्फे सोमवारपासून कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन

परभणी : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे जिल्ह्यात सोमवार (ता. २) पासून पाथरी आणि गंगाखेड येथील केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात होईल, अशी माहिती पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेनके यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी विभागाअंतर्गंतच्या परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांत हमीभावाने कापूस खरेदी करण्यासाठी एकूण चार ठिकाणी केंद्र प्रस्तावित आहेत. जिल्ह्यातील प्रस्तावित खरेदी केंद्र निविदा प्रक्रियेत असल्याने वेळ लागणार आहे. जिल्ह्यात माथाडी कायद्याच्या अंमलबजवणीचा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे या ठिकाणी तूर्त खरेदी सुरू होणार नाही.

जिल्ह्यात पाथरी, गंगाखेड, परभणी या तालुक्यांत आणि हिंगोली जिल्ह्यात हिंगोली येथे पणन महासंघाची खरेदी केंद्र मंजूर आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ, पूर्णा येथे आणि हिंगोली जिल्ह्यात हयातनगर (ता. वसमत), जवळा बाजार (ता. औंढानागनाथ) येथे सीसीआयची खरेदी केंद्र मंजूर आहेत. पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर ८ ते १२ टक्के ओलावा असलेला कापूस स्वीकारण्यात येईल.

आठ टक्के ओलावा असलेला कापूस संपूर्ण हमीभावाने (लांब धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ५ हजार ५५० रुपये) खरेदी केली जाईल, मात्र त्यानंतर ओलाव्याच्या प्रमाणानुसार हमीभाव दरातून एक टक्का रक्कम कपात केली जाईल. १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असलेला कापूस स्वीकारला जाणार नाही. शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणताना काडी कचरा विरहित, स्वच्छ, कवडीचे प्रमाण नसलेला कापूस आणावा. 

सोबत चालू वर्षीचा अद्ययावत पीकपेरा असलेला सात-बारा उतारा आणावा. कापसाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर आरटीईजीएसद्वारे आठ दिवसांच्या कालावधीत जमा केली जातील. त्यामुळे आधार कार्ड संलग्न बॅक पासबुक आणि आधार कार्डची सत्यप्रत सोबत आणावी. केवळ चार चाकी वाहनांमध्ये आणलेल्या कापसाची खरेदी केली जाईल असे रेनके यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

Agriculture Drone : ‘वनामकृवि’मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Cotton Cultivation : आठ राज्यांत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प

Cotton Market : परभणी, हिंगोलीत कापसाची १२.७० लाख क्विंटल खरेदी

SCROLL FOR NEXT