कापूस उत्पादन
कापूस उत्पादन 
मुख्य बातम्या

चीनसह भारतात कापूस उत्पादन घटले

Chandrakant Jadhav

जळगाव ः जगातिक प्रमुख कापूस उत्पादक देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतासह चीनचे कापूस उत्पादन सलग दुसऱ्या वर्षी अपेक्षेपेक्षा कमी आले असून, अमेरिका मात्र उत्पादनात पुढे जात आहे. यंदा तेथे सुमारे १० लाख गाठींनी उत्पादन वाढणार असल्याची माहिती आहे. यातच अमेरिका व चीनमधील व्यापार युद्धाचा लाभ भारतीय सूत उत्पादकांना होत असून, सुताचे दर स्थिरावले आहेत. कापूस बाजारही ८३ सेंटवर स्थिर आहे. अमेरिकेत सुमारे ५० लाख गाठींनी उत्पादन वाढल्याची माहिती बाजारपेठेतील जाणकार, विश्लेषकांकडून     मिळाली.  अमेरिकेने चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर आणखी १०० बिलियन डॉलर आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लागू केले असून, हे व्यापार युद्ध भारतीय सूत उत्पादकांच्या लाभाचे ठरत आहे. भारतात यंदा कापूस लागवडीखालील क्षेत्र सुमारे नऊ लाख हेक्टरने वाढले होते. तरीही उत्पादन मागील वर्षाएवढेच आले आहे. तर चीनमध्ये क्षेत्र सुमारे ४१ लाख हेक्टर होते. तेथेही अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन आले अाहे. यात अमेरिने मात्र सुमारे ५० लाख गाठींचे अधिक उत्पादन घेण्याची किमया यंदा साधली आहे. त्यात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सुताचे दर सुधारले असून, चांगल्या दर्जाचे सूत २०० रुपये किलोवर आहे.  जागतिक कापूस बाजारात रुईसह सुताची आयात सुरू असून, चीन व अमेरिकेतील व्यापार युद्धीने या दोन्ही देशांचा कमोडिटी बाजार अडीच टक्क्यांनी घसरला आहे. जागतिक कापूस उत्पादनात वाढ दिसत असली तरी प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये स्थिती समाधानकारक नसल्याने कापूस बाजारात आयातीच्या हालचाली वाढत आहेत. चीनमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ४४ लाख गाठींनी उत्पादन वाढणार असले तरी आपल्याकडील कापड उद्योगाला हवे तेवढे सूत चीन पुरवठा करू शकत नाही. चीनला किमान ५०० लाख गाठींची गरज आहे. पण गाठींपासून सूत तयार करण्यासंबंधीचा मजूर व इतर खर्च वाढल्याने चीनने सूत आयात वाढविली असून, बांगलादेशसह भारतीय सुताला मागणी आहे. सुमारे १५० मेट्रिक टन सूत आयातीसंबंधीचे सौदे चीनने आशियायी देशांमध्ये केले असून, यातील ३० टक्के सूत भारतातून तेथे निर्यात होण्याचे संकेत जाणकारांनी दिले आहेत.  तसेच आगामी काळातील बाजारातील अस्थिरता लक्षात घेता चीन संरक्षित (बफर स्टॉक) करण्याच्या हालचाली सुरू करत आहे. यामुळे चीनमध्ये कार्यरत काही बहुराष्ट्रीय संस्थांनी रुईची आयात वाढविली आहे.  प्रतिक्रिया सुताचे दर स्थिर आहेत. किंचित सुधारणा सुताच्या दरात दिसत आहे. चीनमध्ये कापसाचे उत्पादन मागील वर्षापेक्षा अधिक दिसत असले तरी ते २०१३-१४ च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटले आहे.  - राजाराम पाटील,  कार्यकारी संचालक, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, लोणखेडा, (ता. शहादा, जि. नंदुरबार) प्रमुख देशांमधील गाठींचे उत्पादन (एक गाठ १७० किलो रुई)

देश    २०१३-१४ २०१४-१५  २०१५-१६   २०१६-१७
भारत ३९८  ३८०  ३४५  ३६२
चीन   ४०७ ३८१  ३०३ ३५०
अमेरिका   १६५   २०९  १६४   २३०
पाकिस्तान   १२२    १३५    ८९   ९३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT