Cotton procurement starts at Manavat shopping center: Survase
Cotton procurement starts at Manavat shopping center: Survase 
मुख्य बातम्या

मानवत येथील खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरु ः सुरवसे

टीम अॅग्रोवन

परभणी : ‘‘मानवत येथील भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रावर गुरूवारी (ता.३०) कापूस खरेदी सुरु झाली आहे. शनिवारी (ता.२) जिंतूर येथे कापूस खरेदी सुरु होईल. पणन महासंघ आणि ‘सीसीआय’च्या उर्वरित केंद्रांवर सोमवार (ता.४) पासून कापूस खरेदी सुरु होईल’’, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी दिली. 

जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ, पूर्णा, ताडकळस या ठिकाणी ‘सीसीआय’ची तर, परभणी, पाथरी, गंगाखेड या ठिकाणी राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची खरेदी केंद्रे आहेत. या केंद्रावर कापूस विक्रीसाठी जिल्ह्यातील १० कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गंतच्या एकूण ४६ हजार ७७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. या शेतकऱ्यांकडे साडेचार लाख ते पाच लाख क्विंटल कापूस शिल्लक आहे. लॉकडाउनमुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करुन कापूस खरेदी सुरु करण्यात आली. 

मानवत येथील ‘सीसीआय’च्या केंद्रावर गुरूवारी ४० वाहनांमधून आणलेल्या कापसाची खरेदी करण्यात आली. शनिवारी जिंतूर येथे खरेदी सुरु होईल. ‘सीसीआय’च्या उर्वरित केंद्रांवर सोमवारपासून कापूस खरेदी सुरु होईल, असे सुरवसे यांनी सांगितले. पणन महासंघाची कापूस खरेदी सोमवारपासून सुरु होईल, असे विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेनके यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT