जळगाव जामोदमध्ये कापूस खरेदी सुरू Cotton procurement starts in Jalgaon Jamod
जळगाव जामोदमध्ये कापूस खरेदी सुरू Cotton procurement starts in Jalgaon Jamod 
मुख्य बातम्या

जळगाव जामोदमध्ये कापूस खरेदी सुरू

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : कापूस पणन महासंघाच्या वतीने हमी भाव खरेदीसाठी जळगाव जामोद येथील श्री कोटेक्स जिनिंग फॅक्टरीमध्ये प्रारंभ करण्‍यात आला. यावेळी वडशिंगी येथील सहदेवराव खिरोडकार यांच्या हस्ते काटापूजन करून प्रथम कापूस आणणारे शेतकरी जानराव शामराव आटोळे व रघुनाथ राजाराम कोकाटे यांचा शेला टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील, बाजार समिती संचालक राजेंद्र देशमुख, प्रकाश गावंडे, शहादेव सपकाळ, रामेश्वर मानकर व कापूस महासंघाचे झोनल मॅनेजर एस. व्ही. खडसे, केंद्र प्रमुख पी. व्ही. गावंडे, जिनिंग फॅक्टरी संचालक प्रमोद कुटे, बाजार समितीचे सर्व कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

मानोरामध्ये खरेदी केंद्राची मागणी वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात कापसाचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला असून, तेथे पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी बाजार समितीच्या संचालक मंडळाने तहसीलदारांमार्फत संबंधितांकडे केली आहे.  बाजार समितीने म्हटले आहे, कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्याने कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. २० जुलै रोजी पणन महासंघाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्रीकरिता नोंदणी करण्याबाबतचे पत्रान्वये कळविले होते. त्यानुसार बाजार समितीमध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हे शेतकरी खरेदी कधी सुरू होते याकडे लक्ष देऊन आहेत. मानोरा हा कापूस उत्पादक पट्टा असून, येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले तर मोठ्या प्रामाणात कापूस खरेदी होईल, अशी अपेक्षा निवेदनात सभापती गोविंद चव्हाण, उपसभापती राजेश नेमाने, संचालक सुनील राठोड, द्वारकादास राठोड यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री शंभुराजे देसाई, खासदार भावना गवळी, जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या  आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : पाताळगंगा नदीत दूषित पाणी

Animal Husbandry : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

SCROLL FOR NEXT