cotton procurement
cotton procurement  
मुख्य बातम्या

कोरोना साईडइफेक्ट : 'पणन'ची कापूस खरेदी बंद होण्याची शक्यता

Vinod Ingole

नागपूर : कोरोनाचा प्रभाव सर्वच क्षेत्रावर दिसू लागला असतानाच शासकीय कापूस खरेदीदेखील यामुळे प्रभावित होण्याची भीती वर्तविली जात आहे. कोरोनामुळे अनेक जिल्ह्यात जमावंबदी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य सहकारी कापूसउत्पादक पणन महासंघ खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती पणनच्या विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.  अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वातावरणातील बदलाच्या परिणामी या वर्षी कापसाची प्रत खालावली. परिणामी कापसाला बाजारात ५५५० रुपये हमीभावाइतकाही दर मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआय तसेच पणन महासंघाला कापूस देण्यासाठी केंद्रावर एकच गर्दी केली. मराठवाड्यातील परळी झोनमध्ये यावर्षीच्या हंगामात सर्वाधिक कापसाची खरेदी झाली. विदर्भात मात्र दरातील तेजीच्या शक्‍यतेने कापसाची साठवणूक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.  सीसीआयकडून सप्टेंबर महिन्यापर्यंत खरेदी सुरू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कापसाची प्रत नसल्याने पणन महासंघाला मात्र यापुढील काळात खरेदी सुरु ठेवणे अडचणीचे ठरत आहे. त्यातूनच अवकाळी पाऊसही अधूनमधून पडत असल्याने प्रत आणखीच खालावत आहे. त्यामुळे होळीच्या आठ दिवसात खरेदी बंद ठेवण्यात आली. सोमवार (ता. १६) पासून खरेदी सुरू करण्याचे प्रस्तावीत होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक जिल्हयात जमावबंदी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्याची दखल घेत खरेदी सुरु ठेवावी की बंद याबाबतचा निर्णय पणन महासंघाकडून आढाव्याअंती घेतला जाणार आहे. राज्यात ५२ लाख क्‍विंटल खरेदी राज्यात या वर्षी विक्रमी ५२ लाख क्‍विंटल कापसाची खरेदी झाली आहे. खरेदी केलेल्या या कापसाची किंमत २८०० कोटी रुपये इतकी असून, त्यातील २३०० कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत अमरावती जिल्ह्यात ४ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT