cotton procurement
cotton procurement  
मुख्य बातम्या

आजपासून कुठे-कुठे होणार पणनची कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन

अमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची खरेदी बुधवार (ता. २७) आजपूासन होणार आहे. अमरावती येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्‍टरीमध्ये काटापूजन करीत खरेदीला प्रारंभ होईल. राज्यात टप्प्याटप्प्याने तब्बल ४२ खरेदी केंद्रे उघडण्यात येतील, असे पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी सांगितले. 

राज्यात सीसीआयची खरेदी सुरूच आहे. परंतु पावसाअभावी कापसाची प्रत योग्य नसल्याने कापूस खरेदीबाबत सीसीआयने सावध पावित्रा घेतला आहे. कापूस खरेदीबाबत वाच्यतादेखील केली जात नसल्याने शासकीय खरेदीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. अखेरीस साऱ्या शक्‍यता आणि चर्चांना पूर्णविराम देत सीसीआयचा एजंट म्हणून पणन महासंघाने बुधवार (ता.२७) पासून खरेदीचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने काटापूजन होणार असून हा कार्यक्रम वलगाव पोलिस ठाण्यामागे असलेल्या शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्‍टरीमध्ये दुपारी चार वाजता होईल. 

या वेळी पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर, खासदर नवनित राणा, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्यासह पणन महासंघाचे संचालक उषा शिंदे, राजकिशोर मोदी, शिरीष धोत्रे, सुरेश चिंचोळकर, ॲड. सुधीर कोठारी, शिवाजी दसपूते, भरत चामले, नामदेव केशवे, प्रसेनजीत पाटील, पंडित चोखट, सुरेश देशमुख, नरेंद्र ठाकरे, संजय पवार, ययाती नाईक उपस्थित राहतील. 

आर्दतेवर ठरणार दर  कापसात आठ टक्‍क्‍यांपर्यंत आर्दता असेल तरच हमीभाव दिला जाणार आहे. त्यानंतर प्रती टक्क्‍यानुसार प्रती किलोची किंमत कमी होईल. बारा टक्‍क्‍यांपर्यंत आर्दता असेल तर चार किलोचे हमीभावानुसार पैसे कमी केले जाणार असल्याचे पणनच्या सूत्रांनी सांगीतले. कापसाचा हमीभाव ५५५० रुपये असून आर्दतेचा विचार करूनच शेतकऱ्यांना पैसे दिले जातील. 

असे आहेत केंद्र  अकोला ः बोरगावमंजू, मानोरा, कारंजा  अमरावती ः अमरावती, लेहगाव, अंजनगाव, अचलपूर, वरुड  नागपूर ः (सावनेर, काटोल, पारशिवणी, उमरेड, फुलगाव)  नांदेड ः भोकर, तामसा.  परभणी ः गंगाखेड, हिंगोली, परभणी  वणी ः चिमूर, गोंडपिंपरी  यवतमाळ ः यवतमाळ, आर्णी, पुसद, कळंब, उमरखेड  खामगाव ः जळगाव जामोद, देऊळगावराजा  औरंगाबाद ः बालानगर, तुर्काबाद, सिल्लोड, खामगाव फाटा, चापडगाव.  परळी ः माजलगाव, भोपा, धर्मापूरी, गोडगाव हुडा, केज  जळगाव ः धरणगाव, अमळनेर, दळवेल, भडगाव, येवला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT