cotton on field
cotton on field  
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यात मजूरटंचाईमुळे कापूस शेतांमध्येच

टीम अॅग्रोवन

अकोला ः शेतीकामांसाठी दिवसेंदिवस मजूर समस्या भीषण होत चालली आहे. मागील काही वर्षांत कापूस उत्पादकांना वेचणी करण्यासाठी मजूर मिळनासे झाले आहेत. जे मजूर मिळतात त्यांना अधिकचा दर द्यावा लागत असल्याने कापूस उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली. दुसरीकडे कापसाचे बाजारमूल्य होते तेवढेच कायम असल्याने दुहेरी आर्थिक फटका या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सध्या कोरडवाहू पट्ट्यात सर्वत्र कापूस वेचणीला आलेला असून, असंख्य शेतांमध्ये बोंडांमधून उमललेला कापूस झाडांवरच असल्याने शेतशिवारे सर्वत्र पांढरी झालेली बघायला मिळत आहेत. राज्यात विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह इतर जिल्ह्यात यंदा कापूस लागवड वाढली होती. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सुमारे ११ लाख २६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे. राज्याचे कापूस लागवड क्षेत्र ४३ लाख ८४ हजार हेक्टरपर्यंत पोचले होते. ओलिताचा कापूस हंगाम अंतिम टप्प्यात असून, कोरडवाहू कापूस वेचणीचा हंगाम अद्याप अर्ध्यातच आहे. या वर्षीचा परतीचा पाऊस कोरडवाहू कपाशीसाठी पोषक ठरला. आधी नुकसान झाले तरी अनेक शेतांमध्ये पुनर्बहर आल्याने कापूस पट्ट्यात या पिकाची स्थिती सुधारली होती. आत या शेतांमध्ये कापसाची वेचणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून रब्बी लागवड, तूर काढणी व कापूस वेचणी अशी कामे एकाच वेळी सुरू आहेत. मात्र मजूर होते तेव्हढेच असल्याने सर्वत्र मजुरांची ओढाताण सुरू असल्याचे चित्र आहे. मजूर समस्येमुळे कापूस वेचणीला सर्वाधिक फटका बसलेला आहे.  सध्या कापूस वेचणी आठ ते १० रुपये प्रतिकिलोने करावी लागत आहे. हा दर देऊनही अनेकांना मजूर मिळत नसल्याने वेचणीचा कापूस अनेक दिवसांपासून झाडांवरच आहे. अधिक दिवस लोटत असल्याने कापसातील कोरडेपणा वाढून त्याचा परिणाम वजनावर होत आहे.  कापूस वेचाई सरासरी ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल द्यावी लागत आहे. बाजारात कापसाचा दर सरासरी ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असा मिळत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT