balaseheb patil
balaseheb patil 
मुख्य बातम्या

कापूस खरेदी केंद्रांना सहकार्य कराः पणनमंत्री बाळासाहेब पाटील 

टीम अॅग्रोवन

मुंबई: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग असला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रांना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये येत असलेल्या काही अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने खरेदी केंद्र आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी (ता.२४) दिल्या.  मंत्रालयात कापूस खरेदी केंद्रांच्या अडचणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदी केंद्रांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कापूस खरेदी करावी. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर कापूस घेऊन जात असताना काही अडचणी असल्यास स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबत सरकार संवेदनशील असून शेतकऱ्यांनी काळजी करु नये.  बैठकीला पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, पणन विभागाचे उपसचिव का. गो. वळवी उपस्थित होते.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT