विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण
विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण 
मुख्य बातम्या

विदर्भात पावसासाठी आज पोषक वातावरण

टीम अॅग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाले आहे. यामुळे विदर्भातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावणात तयार होत आहे. आज (शुक्रवारी) आणि उद्या (शनिवारी) विदर्भातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारी कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाली असून अनेक ठिकाणी उन्हाचा कडाका वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. राज्यातील पुणे, जळगाव, सोलापूर, मुंबई, अलिबाग, डहाणू, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशीम, वर्धा येथील कमाल तापमान ३० अंशाच्या वर गेले आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यतच्या चोवीस तासात परभणी येथे राज्यातील सर्वाधिक ३४ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. कोकणात काही भागात अंशतहा हवामान ढगाळ आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. कोकणातील म्हापसा, पेडणे, सावंतवाडी, वैभववाडी, काणकोन, चिपळून, कणकवली, मालवण, वेंगुर्ला येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. घाटमाथ्यावरील अंबोणे, शिरगाव, ताम्हिणी, कोयना (पोफळी) येथे अधूनमधून पाऊस पडत होता. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा, पारोळा, चांदगड, जावळीमेधा, राधानगरी, सिंदखेडा, मराठवाड्यातील माजलगाव, विदर्भातील देऊळगाव राजा येथेही पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

गुरूवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत हवामान विभाग)

  • कोकण ः म्हापसा, पेडणे, सावंतवाडी, वैभववाडी ३०, काणकोन, चिपळून, कणकवली, मालवण, वेंगुर्ला २०, हर्णे, लांजा, माणगाव, मडगाव, राजापूर, रत्नागिरी, ऊरण, विक्रमगड १०
  • मध्य महाराष्ट्र ः गगनबावडा, पारोळा २०, चांदगड, जावळीमेधा, राधानगरी, सिंदखेडा १०,
  • मराठवाडा ः माजलगाव २०,
  • विदर्भ ः देऊळगाव राजा १०
  • घाटमाथा ः अंबोणे २०, शिरगाव, ताम्हिणी, कोयना (पोफळी) १० 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

    Rural Story : जागरण

    Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

    Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

    Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

    SCROLL FOR NEXT