orange
orange  
मुख्य बातम्या

अहमदाबादची कंपनी करणार संत्रा खरेदी

टीम अॅग्रोवन

अमरावती : संत्रा व्यापाऱ्यांविरोधात एल्गार पुकारणाऱ्या सहा गावांतील शेतकऱ्यांकडून अहमदाबाद येथील प्राइमफ्रेश कंपनीने संत्रा खरेदीबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यासाठी कंपनीचे संचालक मधुर लोणकर व इतरांनी या भागाचा दौरा केला.  अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा, निमखेड, भंडाराजसह सहा गावांत संत्रा लागवड क्षेत्र आहे. या हंगामात उत्पादित संत्रा खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी आपल्या काही अटी घालून दिल्या होत्या. त्यानुसारच खरेदी करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता. व्यापाऱ्यांच्या या झुंडशाहीला विरोध करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांनी आपली नियमावली तयार केली.  त्या शर्तीनुसारच संत्रा विकणार असल्याचे व्यापाऱ्यांना ठणकावत त्यांची मुजोरी मोडीत काढली. यासंदर्भात ‘ॲग्रोवन’च्या २८ ऑक्टोबरच्या अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.  प्रयोगशील शेतकरी प्रवीण बेलखेडे यांच्या माध्यमातून अहमदाबाद येथील प्राइमफ्रेश कंपनीच्या संचालकांनी या वृत्ताची दखल घेतली. त्यानंतर थेट निमखेड बाजार, चौसाळा व इतर काही गावांना भेट देत संचालक मधुर लोणकर यांनी संत्रा उत्पादकांशी संवाद साधला. बाजार दरानुसार किलोप्रमाणे संत्रा खरेदीची तयारी कंपनीने दर्शविली. यासाठी विविध गावांमध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात  आली.  या वेळी प्रवीण बेलखेडे, मधुर लोणकर, उमेश भाला उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT