krushna basin
krushna basin 
मुख्य बातम्या

कृष्णा खोऱ्यातील पाणीवाटपाच्या समन्वयासाठी महाराष्ट्राची समिती

टीम अॅग्रोवन

सोलापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या तीन राज्यांत २००८-०९ ते २०१८-१९ या कालावधीत वापरासाठी मिळालेल्या पाण्याची तंतोतंत व अचूक माहिती सादर करण्यासाठी पुण्याच्या जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या तिन्ही राज्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अंमलबजावणी मंडळाला महाराष्ट्राची माहिती सादर करण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.  कृष्णा खोऱ्यातील वार्षिक पाणी वापर निश्‍चित करण्यासाठी गठित केलेल्या या समितीत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद व बीड या जिल्ह्यांतील अधीक्षक अभियंते, नाशिक येथील आधारसामग्री संकलन नियोजन व जलविज्ञान मंडळाचे अधीक्षक अभियंता, नाशिक येथील आधारसामग्री प्रकरण मंडळाचे अधीक्षक अभियंता हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. पुण्यातील कृष्णा पाणी तंटा लवाद विशेष कक्षाचे अधीक्षक अभियंता या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. पुण्यातील मुख्य अभियंता (वि. प्र.) हे या समितीचे सहअध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.  कृष्णा खोऱ्यातील पूर्ण आणि बांधकामाअधीन असलेले मोठे प्रकल्प, मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प तसेच उपसा सिंचन योजनांचा प्रत्यक्ष पाणीवापर अंतिम करण्यासाठी दर सहा महिन्यांनी या समितीची आढावा बैठक होणार आहे. कृष्णा पाणी तंटा लवादाने दिलेले निर्णय, आदेश, निर्देशाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत आढावा घेणे, कृष्णा पाणी तंटा लवाद कक्ष व कृष्णा खोरे विकास महामंडळ दरम्यान माहितीची देवाण-घेवाण करणे व समन्वय राखणे ही जबाबदारी या समितीवर असणार आहे.  प्रकल्पांचा वार्षिक प्रत्यक्ष पाणी वापर अंतिम करून कृष्णा खोरे विकास महामंडळाला शिफारशीसह सादर करणे, महाराष्ट्राच्या केंद्रीय जल आयोगाच्या अखत्यारीतील सरितामापन केंद्राद्वारे संकलित करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे कृष्णा नदीमधून कर्नाटक राज्यामध्ये दरवर्षी वाहून गेलेल्या पाण्याचे परिमाण निश्‍चित करण्याचीही जबाबदारी या समितीवर असणार आहे. तसेच, पाण्याचा वापराबाबतही समिती दक्ष असेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT