Commencement of crop loan disbursement in Nanded district 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात पीक कर्जवाटपाला सुरवात

नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२१ साठी एक हजार ११८ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बँकांना दिले आहे. या बॅंकांनी शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून कर्ज वाटपाला सुरवात केली.

टीम अॅग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२१ साठी एक हजार ११८ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बँकांना दिले आहे. या बॅंकांनी शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून कर्ज वाटपाला सुरवात केली. २.२१ टक्यानुसार आजपर्यंत दोन हजार ८०६ शेतकऱ्यांना २५ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. यात राष्ट्रीयीकृत बँकांनी आजपर्यंत दोन टक्के पीक कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी आगामी खरीप हंगामात जिल्ह्यासाठी एक हजार १६८ कोटी, तर रब्बीसाठी २९२ कोटी असे एकूण एक हजार ४६० कोटींचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट २८ बँकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले. यात जिल्हा बॅंकेला २०४ कोटी ३२ लाख, राष्ट्रीयीकृत बॅंका ७३८ कोटी ८७ लाख, तर महाराष्ट्र ग्रामीण बॅंक २२४ कोटी ८० लाखांचा समावेश आहे. 

  त्वरित पीक कर्जवाटप करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. यामुळे पेरणीपूर्वी खते, बियाणे घेण्यासाठी बॅंकांनी वेळेवर कर्ज पुरवठा केला, तर शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे जावे लागणार नाही, यासाठी त्वरित पीक कर्जवाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT