cold_1.jpg
cold_1.jpg 
मुख्य बातम्या

राज्यात थंडी परतण्याची शक्यता 

वृत्तसेवा

पुणे : पावसाने उघडीप देताच राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे. आज (ता.९) राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. तर राज्याच्या अनेक भागात निरभ्र आकाश असून पावसाने उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी २० अंशापार गेलेले किमान तापमान पुन्हा १६ अंश किंवा त्यापेक्षा खाली घसरले आहे.   

राज्याचे किमान तापमान कमी होऊ लागल्याने, पहाटे गारठ्यात पुन्हा गारठा आला असून, काही भागात धुके पडत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (ता. ८) महाबळेश्वर आणि औरंगाबाद येथे नीचांकी १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले.   

सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे २९.७ (१५.८), नगर - (१७.६), जळगाव ३१.८(१५.१), कोल्हापूर ३०.५ (१९.८), महाबळेश्वर २३.६(१४.४), मालेगाव ३१.४ (१९.४), नाशिक २७.३ (१७.०), सांगली ३१.७(१८.९), सातारा ३१.०(१७.९), सोलापूर ३३.३ (१६.७), सांताक्रूझ ३२.८(२३.४), डहाणू ३२.९ (२४.३), रत्नागिरी ३४.७ (२३.९), औरंगाबाद २९.९ (१४.४), नांदेड ३३.० (१६.२), उस्मानाबाद - (१७.०), परभणी ३०.५ (१५.५), अकोला ३२.३ (१६.२), अमरावती ३१.४ (१५.७), ब्रह्मपुरी ३३.६ (१५.६), बुलडाणा ३०.० (१५.४), चंद्रपूर ३२.८ (१६.०), गडचिरोली ३२.४(१५.८), गोंदिया ३१.४ (१५.०), नागपूर ३१.२ (१४.१), वर्धा ३०.५(१४.५), वाशीम ३२.० (२०.०), यवतमाळ ३०.५ (१४.५). 

कमी दाब क्षेत्र किनाऱ्यापासून दूर सरकतेय  पूर्वमध्य अरबी समुद्रात तयार तीव्र कमी दाब क्षेत्र किनाऱ्यापासून दूर सरकू लागले आहे. ही प्रणाली मुंबईपासून ८४० किलोमीटर तर गोव्यापासून ८०० किलोमीटर नैर्ऋत्येकडे आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. दरम्यान, अग्नेय बंगालच्या उपसागरात आज (ता.९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, पूर्व किनाऱ्याकडे येताना त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. गुरुवारपर्यंत (ता. ११) ही प्रणाली उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत पोचण्याचे संकेत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT