हिमायतनगरमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सहकुटुंब ठिय्या 
हिमायतनगरमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सहकुटुंब ठिय्या  
मुख्य बातम्या

हिमायतनगरमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सहकुटुंब ठिय्या 

टीम अॅग्रोवन

हिमायतनगर, जि. नांदेड ः हिमायतनगर तालुक्यातील अतिदुग॔म परिसरातील दरेसरसम तलावाचे काम अंतिम ठप्प्यामध्ये असताना एकरी ९ लाख रुपये जमिनीचा मावेजा द्यावा, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २) तलावाच्या कामाच्या ठिकाणी सहकुटुंब ठिय्या आंदोलन सुरू केले. 

हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम, पवना आदेगाव, टेबी या ठिकणच्या शेती सिंचनासाठी लघु पाटबंधारे विभागातर्फे २००७ मध्ये दरेसरसम तलावाचे काम सुरू करण्यात आले. काम हे अंतिम टप्प्यामध्ये असताना गेल्या आठ वर्षापासून बंद होते. 

या तलावासाठी अनेक शेतकऱ्यांची ३०० हून अधिक एकर जमिन संपादित करण्यात आली. परंतु संपादित जमिनीचा मावेजा देताना २५ शेतकऱ्यांना एकरी ९ लाख रुपये याप्रमाणे देण्यात आला. तर ९५ शेतकऱ्यांना एकरी १ लाख ३० हजार रुपये प्रमाणे मावेजा देण्यात आला. 

त्यामुळे एकसमान म्हणजेच एकरी ९ लाख रुपयाप्रमाणे जमिनीचा मावेजा देण्यात यावा, या मागणीसाठी ९५ शेतकऱ्यांनी कुटुंबासह तलावाच्या भिंती जवळ ठिय्या आंदोलन करत तलावाचे काम रोकले. प्रशासनाने प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत घेण्याचे आश्वासन दिले होते, तेही पूर्ण केले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT