Closed Rohitra undone from MSEDCL 
मुख्य बातम्या

बंद केलेले रोहित्र महावितरणकडून पूर्ववत जोडले

महावितरणने शेतकऱ्यांकडून सुरू केलेली सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी व बंद केलेले रोहित्र चालू करावे, या मागणीनंतर रोहित्र सुरू करण्यात आले.

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : महावितरणने शेतकऱ्यांकडून सुरू केलेली सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी व बंद केलेले रोहित्र चालू करावेत, या मागणीसाठी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी शेकडो शेतकऱ्यांसह बुधवारी (ता. २) संग्रामपूर येथे महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांच्या दबावापुढे प्रशासनाने नमते घेत बंद केलेले रोहित्र पुन्हा सुरू करून दिले.  सध्या या भागात रब्बीतील पिके परिपक्व होण्याच्या अवस्थेत आलेले आहेत. अशा स्थितीत वीजबिल वसुलीच्या कारणाने तालुक्यात ५० ते ६० रोहित्र बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यात हाहाकार उडाला होता. महावितरणकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात होते. कांदा, हरभरा यासारखी पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येथे ‘स्वाभिमानी’च्या नेतृत्वात महावितरणचे अभियंता श्री. नवलकर यांच्यासमोर आपबिती मांडली. अखेर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत बंद केलेले रोहित्र तत्काळ चालू करण्यात येणार असल्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. या वेळी रोशन देशमुख, जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, तालुकाध्यक्ष उज्ज्वल पाटील खराटे, विजय ठाकरे, योगेश मुरूख, संतोष गाळकर, योगेश वखारे, शिवा पवार, प्रवीण पोपटनारे, आशिष सावळे, सुपडा सोनोने, रामकृष्ण गांवडे, महादेव चवरे, विठ्ठल वखारे, रवी चोपडे, गजानन रावणकार, दत्ता डिक्कर, ज्ञानेश्वर नांदने यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy: शेतकऱ्यांना वीज अनुदान, धानासाठी प्रति क्विंटल २,७०० रुपये हमीभाव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

Flower Growers: पातूरच्या शेतकऱ्यांनी जोपासली फुलशेतीची परंपरा

Pokhara 2.0 Scheme: पोकरा 2.0 अंतर्गत हरितगृह, शेडनेटमधील भाजीपाला व फुलांना सहाय्य; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

Rural Development: कल्पनाताईंनी समर्थपणे सांभाळली ‘ग्राम गौरव’ची धुरा

Lakhpati Didi Scheme: लखपती दीदी २.०! महिलांना मिळणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT