solapur cm
solapur cm 
मुख्य बातम्या

आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्री

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसांत पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.  अतिवृष्टी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यावर मोठी आपत्ती कोसळली. सव्वालाख हेक्‍टरहून अधिक शेतपिकांचे नुकसान झाले. अनेक गावातील घरांची पडझड झाली. त्यातून लोक अद्यापही सावरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता.१९) अक्कलकोट तालुक्‍यातील नुकसानीची पाहणी केली. शिवाय तत्काळ मदत म्हणून येथे त्यांनी काही शेतकऱ्यांना धनादेशही दिले.  अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री ठाकरे सोमवारी सकाळीच थेट अक्कलकोट तालुक्‍यातील सांगवी खुर्दला पोचले. परंतु पुढे पावसामुळे चिखल झाल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर न जाण्याचा सल्ला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दिला. तसेच बोरी नदीच्या पुलावरुनच शेतकऱ्यांशी संवाद साधा, असे सुचवले. तसा निरोप गावातील शेतकऱ्यांना दिला. शेतकरीही थेट पावसाने ओरबडलेली पीके हातात घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचले. तिथे त्यांना आपली व्यथा सांगितली. तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांनीही काळजी करु नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे आश्‍वासन दिले. तसेच पंचनामे सुरु आहेत ना, नुकसान काय, काय झाले, अशी त्यांची विचारपूस केली. सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसांत पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं आश्‍वासन देत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.   यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

मदतनिधीवरुन टोलवाटोलवी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सकाळी बारामती दौऱ्यावर होते. दुपारुन ते सोलापूर दौऱ्यावर येणार होते. त्यावेळी बारामती दौऱ्यात केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याने मदत करावी, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्राने राज्याची देणी वेळेवर दिली, तर मदत मागायची गरज नाही, असे उत्तर देऊन त्यांच्यावर पलटवार केला. शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रश्‍नावर या दोघांनीही एकमेकांवर टोलवाटोलवी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT