राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ देणार नाहीः छगन भुजबळ 
मुख्य बातम्या

राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ देणार नाहीः छगन भुजबळ

टीम अॅग्रोवन

नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर नाचून केवळ मोदींचे चोचले पुरविण्यासाठी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचे काम सुरू आहे. मात्र मी जिवंत असेपर्यंत राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ देणार नाही,’’ असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. 

नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता. २१) हरसुल येथे जाहीर सभा घेण्यात आली. माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, आमदार निर्मला गावित, हिरामण खोसकर, बहीरू मुळाणे, सचिन पिंगळे आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, ‘‘आदिवासींच्या विकासासाठी पेसा कायदा केला. ठक्करबापा योजना आदींसह आदिवासींच्या बहुतांशी योजना या सरकारने बंद पाडून त्यांचा विकासच थांबवला. मोदी सुडाचे राजकारण करत अाहेत. आमची जातच विकास आहे. गोरगरिबांचे प्रश्न सोडविणे हाच आमचा धर्म आहे. आम्ही विकास केला आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मत मागत आहोत.’’

पिचड म्हणाले, ‘‘जाती-धर्मात तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवत युती सरकारने सत्ता काबीज केली. शून्य विकास केलेल्या या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागितली. मात्र, त्यांनी एका तरी किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी एक दगड तरी लावला का? या फेकू सरकारने केवळ आदिवासींना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. अशा कपाळकरंट्या व थापाड्या सरकारला घरचा रस्ता दाखवा.’’

‘‘ही निवडणूक देशाला दिशा देणारी आहे. देशातील नोटबंदीमुळे आदीवासींना फटका बसला. वनजमिनी वनपट्टा जमिनीचे दावे या सरकारने फेटाळून लावले. आदिवासींसाठी असलेल्या ठक्करबाप्पा योजना देखील बंद पाडल्या,’’ असा आरोप गावित यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Corona Virus Immunity: विषाणूंना रोखणारी नवी उपचार पद्धती विकसित

Zero Tillage Farming: शून्य मशागत तंत्रातून गवसला यशाचा मार्ग

Duplicate Voter Issue: मतचोरीचे वास्तव...

Developed India: दिशा विकसित भारताची!

Cooperative Department: लेखा परीक्षा मंडळाची पदे सहकार विभागाकडे वर्ग

SCROLL FOR NEXT