घोडे
घोडे 
मुख्य बातम्या

सारंगखेड्याचा ‘चेतक महोत्सव’ आजपासून

टीम अॅग्रोवन

मुंबई : नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे आजपासून (ता. १२) चेतक महोत्सव सुरू होत आहे. सारंगखेडा येथे भरणाऱ्या घोड्यांच्या पारंपरिक बाजाराला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या चेतक महोत्सवाची जोड मिळाल्यापासून यंदाच्या वर्षीही या महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना या भागात आकर्षित करून उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला चालना देण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.    मंत्री रावल आणि पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. चेतक महोत्सव समिती आणि एमटीडीसी यांच्यामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. घोड्यांच्या बाजारासोबत शस्त्रास्त्र प्रदर्शन, घोड्यांच्या स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा, फोटो प्रदर्शन, घोडेस्वारी, टेंट सिटी, लावणी महोत्सव, कव्वाली महोत्सव होणार आहेत. ८ जानेवारी २०१९ पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन मंत्री श्री. रावल यांनी केले आहे. सारंगखेड्याच्या दत्त मंदिराच्या यात्रेला चेतक महोत्सवाची जोड मिळाल्याने देश-विदेशातील लाखो पर्यटक सहभागी होतील, असा विश्वास मंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केला. यानिमित्ताने घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अश्व पोस्टर स्पर्धेत आतापर्यंत १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला असून या पोस्टर्सच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटनही पहिल्या दिवशी करण्यात येणार आहे. घोड्यांची चाल, सौंदर्य, शक्ती, वेग व नृत्य या स्पर्धासोबत ॲडव्हेंचर स्पोर्टस्‌, वॉटर स्पोर्टस्, सायकलिंग, हॉर्स डान्स, हॉर्स शो यासोबतच भजनसंध्या, कबड्डी स्पर्धा, पालखी सोहळा, लावणी महोत्सव, हास्य कविसंमेलन यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे प्रमुख आकर्षण 

  • देश-विदेशांतून येणाऱ्या पर्यटकांसाठी खास पहाडी घोडेस्वारीची संधी
  • निवासासाठी लक्झरी टेंटसह डॉर्मिटरीचीही व्यवस्था
  • दोन विशेष कॅमेरे करणार हेड काउंट, त्यामुळे यात्रेला येणाऱ्या पर्यटकांची नेमकी संख्या मोजता येणार
  • हॉर्स लव्हर्स, क्लब्ज, ब्रिडर्स यांचा डेटा बेस, त्यामुळे जातिवंत अश्वांची पारख करण्यास मदत
  • स्थानिक महिलांसाठी उद्योजकता कार्यशाळा
  • स्थानिक कलाकारांसाठी मुक्त कला मंच
  • स्थानिक अन्नपदार्थांचे फूड कोर्ट
  • पुरातन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT