पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटील

टीम अॅग्रोवन

पुणे  : जिल्‍ह्याच्या पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून मंत्री गिरीश बापट खासदार झाल्यानंतर त्यांनी आमदार आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. बापट हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर कोणाची नियुक्ती होणार याबाबत चर्चा सुरू होती. 

पालकमंत्रिपदी जिल्ह्यातील आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात होती. यामध्ये प्रामुख्याने शिरूरचे ज्येष्ठ आमदार बाबूराव पाचर्णे आणि मावळचे आमदार आणि पुणे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांची नावे चर्चेत होती. मात्र विधानसभा निवडणुका चार महिन्यांवर आल्या असल्याने नाराजीनाट्य नको म्हणून महसूल आणि कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी पक्षाने दिली असल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात श्री. पाटील यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग खुबीने करून घेण्यासाठी पक्षाने विशेष जबाबदारी दिली असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी श्री. पाटील यांच्यावर सोपविण्यात आली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT