Chance of a Thunderstorm
Chance of a Thunderstorm 
मुख्य बातम्या

मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे : गुलाब चक्रीवादळाची प्रणाली गुजरातकडे सरकून गेल्याने राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. ३०) उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पूर्वविदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

दक्षिण गुजरात आणि खंबातच्या आखातामध्ये ठळक कमी दाबाचे क्षेत्र आहे. पश्‍चिमेकडे सरकत असलेली ही प्रणाली आज आणखी तीव्र होणार आहे. पश्‍चिम बंगाल आणि परिसरावरही हवेचे ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दोन्ही प्रणालींच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. 

पालघरमध्ये वादळी पावसाचा इशारा अरबी समद्रात तीव्र होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे आज (ता. ३०) उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कोकण : पालघर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक. विदर्भ : भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

Grain Storage : देशातील धान्य साठवणूक अन् वितरण व्यवस्था

Water shortage : जायकवाडी धरणाने वाढवली छ. संभाजी नगरकरांची चिंता; धाराशिवला टँकरचा आधार

Tomato Disease : टॉमॅटो पिकातील ‘लवकर येणारा करपा’

SCROLL FOR NEXT