Chance of rain in Konkan, Central Maharashtra, Marathwada
Chance of rain in Konkan, Central Maharashtra, Marathwada 
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येताच निवळले असले, तरी राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजासंह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  राज्यात अंशत: ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. शनिवारी (ता.१३) सकाळी निफाड येथे नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पारा १४ अंशांच्या पुढे गेला आहे. सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले. 

शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३१ (१६), नगर ३१.७ (१७.९), जळगाव ३१.८(१४.४), कोल्हापूर ३०.६ (२३.५), महाबळेश्‍वर २७.४ (१६.८), मालेगाव २८.६ (१४.६), नाशिक २८.५ (१२.५), निफाड २९.१ (११), सांगली ३१.३ (२३.६), सातारा ३०.६ (२२.३), सोलापूर ३२ (२१.३), सांताक्रूझ ३५.३ (२१.६), अलिबाग ३३.४ (-), डहाणू ३३ (१९.६), रत्नागिरी ३३.५ (२४.२), औरंगाबाद ३०.७ (१७.६), नांदेड ३२.२ (१८.२), उस्मानाबाद - (१४.४), परभणी ३१.२ (२१), अकोला ३१.८ (२२.६), अमरावती ३१.४ (२०.९), ब्रह्मपुरी ३०.६ (२२.२), बुलडाणा २९.६ (१८.२), चंद्रपूर २९.४ (२१.४), गडचिरोली ३०.४ (२०.४), गोंदिया २९.५ (२०.०), नागपूर ३१.२ (२२.४), वर्धा ३१.२ (२२), वाशीम ३२ (१९), यवतमाळ २९ (२०). 

   कमी दाब क्षेत्राची निर्मिती   थायलंडच्या आखाताजवळ वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्र आणि थायलंड परिसरावर कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती झाली आहे. सोमवारपर्यंत (ता.१५) या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. गुरुवारपर्यंत (ता.१८) ही प्रणाली आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT