Chance of light rain in the state
Chance of light rain in the state 
मुख्य बातम्या

राज्यात हलक्या पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १६) कोकणात बहुतांशी ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, अमरेली, बडोदा, शाजापूर, ठळक कमी दाब क्षेत्र, अंबिकापूर, बालासोर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तर मॉन्सूनच्या आसाला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरात, पश्चिम बंगालपर्यंत कायम आहे. राज्यात पाऊस ओसरला असून, अनेक भागात पावसाने उघडिप दिली आहे. बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग) :

कोकण : पालघर : डहाणू २२, जव्हार २७, तलासरी २५. रत्नागिरी : संगमेश्वर ४०, सिंधुदुर्ग : सावंतवाडी २०. ठाणे : उल्हासनगर २८.

मध्य महाराष्ट्र : धुळे : गिधाडे ३१. कोल्हापूर : गगणबावडा २२. नाशिक : इगतपुरी २३. सातारा : महाबळेश्वर ४८.

विदर्भ : अमरावती : अंजणगाव २३, धारणी २९, वरूड ३०, भंडारा : साकोली २२. गडचिरोली : कोर्ची ५३. गोंदिया : आमगाव २७, अर्जुनीमोरगाव २४, देवरी ४३, गोंदिया ३४, गोरेगाव २२, सालकेसा २४. नागपूर : कुही २२, मौदा २२, नरखेडा ३३, सावनेर २४.

ठळक कमी दाब क्षेत्र निवळतेय आग्नेय मध्य प्रदेश व परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र असून, ही प्रणाली कमजोर होत आहे. गुजरातवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT