Chance of hail in the south area
Chance of hail in the south area 
मुख्य बातम्या

दक्षिण भागात गारपिटीची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान काही भागात ढगाळ वातावरण तयार होत असल्याने तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरी बरसत आहेत. येत्या आठवडाभर राज्याच्या दक्षिण भागात वादळ, गारपिटीसह पूर्वमोसमीच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

सध्या बिहार ते दक्षिण तमिळनाडू, झारखंड, उडिसा, विदर्भ, तेलंगाना आणि रायलसीमा दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्र सपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच झारखंड ते मध्य प्रदेशचा आग्नेय भागातही कमी दाबाचा पट्टा आहे. तर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तर गुजरातच्या दक्षिण भाग आणि राजस्थानचा आग्नेय व नैऋत्य भागातही चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. मध्य प्रदेशचा परिसर व उत्तर प्रदेशाच्या ईशान्य भागातही चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या भूपृष्टभागावरून वाहत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसत आहेत.

सध्या उन्हाच्या झळा सकाळपासून तीव्र होत आहे. त्यामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात काही प्रमाणात वाढ होत आहे. सोमवारी (ता. २६) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक ४३.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातील पुणे येथे सर्वात कमी १९.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. शनिवारी (ता. २४) दुपारनंतर सातारा, नाशिक, लातूर या जिल्ह्यात दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन ढग जमा झाल्याने तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या होत्या.

या जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाची शक्यता मंगळवार ः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव,  नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ. बुधवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ. गुरुवार ः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया नागपूर, वर्धा, यवतमाळ. शुक्रवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया नागपूर, वर्धा, यवतमाळ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT