पंढरपुरात मंगळवारी चैत्री एकादशीनिमित्त चंद्रभागा नदीत स्नानासाठी गर्दी झाली होती
पंढरपुरात मंगळवारी चैत्री एकादशीनिमित्त चंद्रभागा नदीत स्नानासाठी गर्दी झाली होती 
मुख्य बातम्या

चैत्री वारीचा पंढरपुरात उत्साह

टीम अॅग्रोवन

पंढरपूर, जि. सोलापूर  ः पंढरपुरात चैत्र शुद्ध कामदा एकादशीच्या सोहळ्यामध्ये सुमारे दोन लाखांहून अधिक वारकरी मंगळवारी (ता. २७) सहभागी झाले होते. चंद्रभागा नदीचे वाळवंट, ६५ एकर आणि प्रदक्षिणा मार्गावरून निघालेल्या दिंड्यांमधील टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयषोघामुळे पंढरी भक्तिमय झाली होती. दर्शनासाठी सुमारे अकरा तास लागत होते. चैत्री एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची पूजा मंदिर समितीचे सदस्य भास्कर गिरी महाराज यांच्या हस्ते, तर श्री रुक्‍मिणीमातेची पूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते सपत्नीक झाली.  चैत्री एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी पहाटेपासूनच लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पुंडलिक मंदिरापर्यंत आले होते. तत्पूर्वी सकाळी ९ वाजेपर्यंत लाखो भाविकांना नदीपात्रातील घाण पाण्याने स्नान करावे लागल्याने भाविकांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्यालगतच्या एक नंबर पत्राशेडपर्यंत गेली होती. सकाळी दहा वाजता श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलेले रघुनाथ युवराज पाटील (रा. कारंडे वाडी, ता. करवीर, जिल्हा ः कोल्हापूर) म्हणाले, ‘‘आम्ही रात्री नऊ वाजता स्मशानभूमीजवळच्या दर्शनरांगेत उभे होतो. अकरा तासांनी सकाळी नऊ वाजता आम्ही दर्शन घेतले. दर्शन रांगेत कुठेही घुसखोरी झाली नाही. नगर प्रदक्षिणेला निघालेल्या भाविकांच्या गर्दीने प्रदक्षिणा मार्ग फुलून गेला होता. दिंड्यांमधील हजारो वारकरी भरउन्हात टाळ-मृदंगाच्या गजरात तल्लीन होत, अभंग म्हणत नगर प्रदक्षिणा करताना दिसत होते. शिंगणापूर यात्रेला जाण्यापूर्वी चंद्रभागा नदीत सासनकाठ्यांना स्नान घालून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे अनेक भाविक सासनकाठ्यांना घेऊन नगर प्रदक्षिणा करून शिंगणापूरच्या यात्रेला रवाना झाले. मंदिर समितीच्या वतीने लाडू प्रसादासाठी यंदा प्रथमच कागदी पिशव्यांचा वापर करण्यात येत आहे. भाविकांना पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने यात्रेदरम्यान शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. पालिकेचे ३६५ व हंगामी ७५० सफाई कर्मचाऱ्यांकडून सर्वत्र स्वच्छता करण्यात येत आहे. शहरातील कचरा आरोग्य विभागाकडील विविध वाहनांमधून तातडीने उचलण्यात येत आहे. याशिवाय ५५ घंटागाड्या नियमितपणे शहरातील कचरा गोळा करीत आहेत. यात्रा कालावधीमध्ये भाविकांच्या सुरक्षेसाठी व शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT