ब्राझीलच्या साखर उत्पादनात वाढ
ब्राझीलच्या साखर उत्पादनात वाढ 
मुख्य बातम्या

ब्राझीलच्या साखर उत्पादनात वाढ

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली : दक्षिण-मध्य ब्राझीलमधील साखर कारखान्यांनी डिसेंबरच्या पंधरवाड्यात एकूण ५०६००० टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षात या कालावधीत येथे कारखान्यांनी ३७५००० टन साखर उत्पादित केली होती. तुलनेत यंदा ३४.८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे साखर उद्योग संघटनेच्या (यूएनआयसीए) अहवालात म्हटले आहे.

साखर उत्पादन आणि निर्यात करण्यासाठी जागतिक पातळीवर ब्राझील आघाडीवर आहे. येथे साखरेचे उत्पादन एप्रिल ते मार्च या कालावधीत सुरू असते. दक्षिण मध्य ब्राझीलमध्ये कारखान्यात साखरेचे उत्पादन ऑक्टोबरपर्यंत सुरू असते. याच भागातून देशाच्या एकूण ९० टक्क्यांहून अधिक साखरेचे उत्पादन घेतले जाते.

एप्रिल-ऑक्टोबरमधील गळीत हंगामात (१ एप्रिल ते १५ डिसेंबर) ५७८.७६ दशलक्ष टन उसाचे गाळप करण्यात आले असून, यामध्ये वार्षिक १.७ टक्क्यांनी घसरण झाली. यामधून सुमारे ३५.५९ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले असून, हे मागील वर्षीच्या तुलनेत १.४ टक्क्यांनी वाढले आहे.

इथेनॉल उत्पादन स्थिती जागतिक इथेनॉल उत्पादनात ब्राझीलचा क्रमांक दुसरा आहे, तर एकूण जागतिक इथेनॉल उत्पादनापैकी २० टक्के वाटा असून, जागतिक इथेनॉल निर्यातीतही २० टक्के वाटा आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात दक्षिण-मध्य विभागातील कारखान्यांनी २४.९६ अब्ज लिटर इथेनॉलचे उत्पादन केले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत २४.७५ अब्ज लिटर इथेनॉलची निर्मिती झाली होती. ब्राझीलमध्ये एकूण उस गाळपापैकी :

  • साखर उत्पादनासाठी ४७ टक्के वापर
  • इथेनॉल निर्मीतीसाठी ५३ टक्के वापर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

    Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

    Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

    Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

    Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

    SCROLL FOR NEXT