पीक नुकसानीची पाहणी करताना केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे
पीक नुकसानीची पाहणी करताना केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे 
मुख्य बातम्या

आठवडाभरात केंद्राचे पथक भेट देणार : केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे

टीम अॅग्रोवन

अकोला  ः अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकाचे पूर्णपणे नुकसान होऊन शेतकरी हतबल झाला आहे.  शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र व राज्य सरकार उभे असून, लवकरच केंद्रीय पथक भेट देऊन शेतकऱ्यांना एका आठवड्यात आर्थिक मदत देणार, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिले. 

धोत्रे यांनी रिसोड- मालेगाव भागाचा दौरा केला. तसेच त्यांनी आ. रणधीर सावरकर, आ. प्रकश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. नितीन देशमुख यांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्याची परीस्थिती व विदर्भाच्या परिस्थितीची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.धोत्रे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार असल्याचे सांगितले. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद, बाजरी, मका, फळबाग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ संपूर्ण शेतकऱ्यांनी घेतला नाही त्यामुळे शासनाने त्वरित आढावा घेऊन मदत जाहीर करावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सोयाबीन, कपाशी, ज्वारी, मूग, उडीद मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीचा हात देण्यात यावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे सांगितले. 

या वेळी त्यांच्यासोबत विजयराव जाधव, शंकरराव बोरकर, तानाजी पवार, सुरेश मुंडे, दादाराव खराटे, मारोतराव लादे, उल्हास अवचार, पांडुरंग जाधव, राजेश सांगळे,  भागवतराव लोखंडे, प्रशांत देशमुख, प्रवीण लादे, अप्पर जिल्हाधिकारी जितेंद्र वानखेडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसीलदार रवी काळे, अजित शेलार यांच्यासह मालेगाव रिसोड तालुक्यातील महसूल मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT