कापूस पाऩे
कापूस पाऩे 
मुख्य बातम्या

‘बीटी’ची पाने तपासण्याचे केंद्र सरकारचे आदेश

Vinod Ingole

अमरावती ः राज्यात कापसावर गुलाबी बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने बीटी कापूस झाडांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अमरावती विभागातून बीटी कापूस झाडांची हिरवी पाने नागपुरातील दोन तसेच हैदराबाद येथील एका प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली. अशाप्रकारचे तब्बल ४१० नमुने काढण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या विश्‍वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.  या वर्षी राज्यात बीटी कापसावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. अमरावती विभागाला याचा सर्वाधीक फटका बसला. राज्याच्या ३९ लाख हेक्‍टर लागवड क्षेत्रापैकी या वर्षी अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ या पाच जिल्ह्यातील लागवड ९ लाख ९७ हजार हेक्‍टर आहे. त्यातील ७ लाख ७६ हजार हेक्‍टर क्षेत्र गुलाबी बोंड अळीने प्रभावीत झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. गुलाबी बोंड अळीग्रस्तांना कंपन्यांमार्फत हेक्‍टरी ३० हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचे आदेश देण्यात आले आहेत; मात्र बीटी तंत्रज्ञानाचे हे अपयश असल्याचे सांगत त्यास कंपन्यांनी नकार दिला आहे. प्रयोगशाळेत तपासणी आणि बियाणे खराब असण्याविषयी कोणताच अहवाल नसताना नुकसानभरपाई देण्यास सांगितले जात असल्याने कंपन्यांकडून नाराजी व्यक्‍त करण्यात आली होती. त्या पार्श्‍वभूमीवर अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे; परंतु बीटी जनुकांचा प्रभाव पानांमध्ये केवळ १२० दिवसच राहतो. त्यानंतर तो कमी कमी होत असल्याने कृषी विभागाचे हे प्रयत्न म्हणजे वरातीमागून घोडे या प्रकारातील असल्याची चर्चा रंगली आहे

नेमक्या कारणांचा शोध घेण्याची सूचना बीटी जनुकांचा प्रभाव (एक्‍सप्रेशन) हा बियाण्यात सर्वांत कमी, फूल आणि पात्यामध्ये त्यापेक्षा थोडा अधिक, तर पानांमध्ये १२० दिवस राहतो आणि त्यानंतर हा प्रभाव कमी होत जातो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या नेमक्‍या कारणांची माहिती घेण्याकरिता केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना केली. त्यानुसार राज्य सरकारकडून जानेवारीत बीटी कापसाच्या हिरव्या पानांचे नमुने घेण्याचे आदेश कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण शाखेला दिले गेले. राज्यभरात अशाप्रकारे मोहीम राबविण्यात आली. अमरावती विभागात विविध कंपन्यांच्या कपाशी वाणांच्या पानांचे ४१० नमुने घेण्यात आहे. हे नमुने नागपुरातील दोन तसेच हैदराबाद येथील एका प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये नामांकीत कंपन्यांच्या बीटी झाडांच्या पानांचा समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT