cotton procurement
cotton procurement  
मुख्य बातम्या

सीसीआय’ची कापूस खरेदी चार दिवस बंद 

टीम अॅग्रोवन

परभणी ः महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोशिएशनचा संप तसेच मकर संक्रांतीची सुट्टी असल्यामुळे राज्यातील भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मराठवाडा, खानदेश तसेच नगर जिल्ह्यातील ४८ केंद्रांवरील कापूस खरेदी सोमवार (ता. ११) ते गुरुवार (ता. १४) या कालावधीत बंद राहणार आहे. या बाबत केंद्र प्रमुखांनी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सूचना द्याव्यात, असे आदेश ‘सीसीआय’च्या औरंगाबाद येथील उपमहाव्यवस्थाकांनी पत्राद्वारे दिले आहेत. 

‘सीसीआय’ तसेच पणन महासंघाकडून लॉकडाउनच्या काळात खरेदी केलेला कापूस, सरकी, गाठी यांच्या नुकसानीबद्दल भरपाईची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र कॉटन जिनिर्स असोसिएशन तर्फे सोमवार (ता. ११) आणि मंगळवारी (ता. १२) जिनिंग कारखाने बंद ठेवण्यात आहेत. त्याबाबत असोसिएशनने ‘सीसीआय’ला कळविले आहे. बुधवारी (ता. १३) भोगी आणि गुरुवारी (ता. १४) मकर संक्रांत असल्यामुळे कापूस खरेदी बंद राहणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी या कालावधीत शेतकऱ्यांनी या केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन करण्यात यावे.  केंद्र प्रमुखांना आदेश  या कालावधीत केंद्र प्रमुखांनी परवानगीशिवाय केंद्र कार्यालय सोडू नये, असे आदेश भारतीय कापूस महामंडळाच्या बदनापूर, भोकरदन, बीड, भुसावळ, चाळीसगाव, बोदवड, जामनेर, दोंडाईचा, जिंतूर, जवळा बाजार, जालना, चोपडा, जळगाव, घनसावंगी, गेवराई, गंगापूर, एरंडोल, नंदुरबार, धर्माबाद, कुंटुर, नायगाव, किनवट, वसमतनगर, नांदेड, मानवत, मंठा, लासूर, पाचोड, वैजापूर, शिरपूर, शेवगाव, शहादा, सेलू, ताडकळस, पूर्णा, परतूर, शेंदूर्णी, पहूर, पाचोरा, शहागड, वडवणी, राजूर, शिंदखेडा, नवापूर, यावल, रावेर, बोरी, सोनपेठ येथील केंद्र प्रमुखांना दिले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

SCROLL FOR NEXT