cashew
cashew  
मुख्य बातम्या

सिंधुदुर्गात काजू बी खरेदीला सुरुवात

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः फळबागायतदार संघ सावंतवाडी आणि दोडामार्गच्या माध्यमातून जिल्ह्यात काजू खरेदीला सुरुवात करण्यात आली असून काजूला प्रतिकिलो १४० रुपये दर दिला जात आहे. नेतर्डे (ता. सावंतवाडी) येथे गुरुवार (ता. २५) पासून काजू खरेदी सुरू झाली असून पहिल्या दिवशी ४० टन खरेदी करण्यात आला. टप्प्याटप्प्याने दोन्ही तालुक्यात काजू खरेदी करण्यात येणार आहे.  शेतकऱ्यांच्या काजू बीला चांगला दर मिळावा या हेतुने गेल्यावर्षीपासून फळबागायतदार संघ सावंतवाडी आणि दोडामार्गच्या वतीने काजू खरेदी केली जाते. थेट कारखानदाराने काजू बी खरेदी करावी, यासाठी फळबागायतदार संघ आग्रही आहे. दरम्यान गुरुवारपासून सावंतवाडी येथील नेतर्डे खरेदी केंद्रावर काजू खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली. काजूला प्रतिकिलो १४० रुपये दर सध्या देण्यात येत आहे.  या खरेदीच्या वेळी संघाचे अध्यक्ष विलास सावंत, विदर्भकोकण ग्रामीण बँकचे व्यवस्थापक कृष्णाजी कोठावळे, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, सौरभ सिद्धये, नितीन मावळणकर, विलास गवस, जगदेव गवस, प्रशांत कामत आदी उपस्थित होते.  दरम्यान काजू बी खरेदी सुरुवात होताच पहिल्या दोन तासातच साडे नऊ टन काजू बी खरेदी झाली. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत तब्बल ४० टन काजू बी खरेदी करण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी शेतकऱ्यांना थेट कारखानदारापर्यंत घेऊन जाण्याचे काम संघामार्फत केले जात आहे. एक किलो काजूचे पीक घेण्यासाठी सरासरी खर्च १२२ रुपये येतो. त्याला बाजारात कधी १३० ते १४० रुपये दर मिळतो. त्यामुळे तो शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक दर मिळवून देण्यासाठी कारखानदारांनी थेट काजू खरेदी करावी, यासाठी संघाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT