कसाल, जि. सिंधुदुर्ग : सध्या कोकणात काजूसाठी चांगले हवामान असल्याने काजूची झाडे अशी मोहरांनी बहरली आहेत. (छायाचित्र ः राजकुमार चौगुले)
कसाल, जि. सिंधुदुर्ग : सध्या कोकणात काजूसाठी चांगले हवामान असल्याने काजूची झाडे अशी मोहरांनी बहरली आहेत. (छायाचित्र ः राजकुमार चौगुले) 
मुख्य बातम्या

मोहराने बहरल्या काजूच्या बागा

Raj Chougule

सिंधुदुर्ग : डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहातील थंडीच्या तडाख्यातून बचावलेला काजू मोहर आता चांगलाच बहरात आला आहे. सध्या कोकणात काजूसाठी वातावरण पोषक बनले आहे. वातावरणात अनपेक्षित बदल न झाल्यास यंदा काजूच्या उत्पादनात चांगलीच वाढ होण्याची शक्‍यता आहे. सध्या तरी बहुतांशी काजू बागा मोहराने बहरल्या आहेत.

काजूचा सरता हंगाम काजू उत्पादकांना संमिश्र गेला. गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यात काजूची खरेदी किलोस १६० ते १७० रुपयांच्या आसपास सुरू झाली. जसा उन्हाळा वाढत गेला, तसे दर खाली आले. हा दर ११५ रुपयांपर्यंत येऊन ठेपला. नोटाबंदीचा तर परिणाम झालाच, तसेच मागणी कमी झाल्याने दराच्या दुष्टचक्रात काजू उत्पादक अडकला. दोन वर्षापूर्वी काजू उत्पादनात घट झाल्याने अनेक व्यापाऱ्यांनी गेल्या वर्षीसाठी आफ्रिकेतून काजूची मागणी नोंदविली होती. यामुळे कोकणातील काजूला मागणी कमी राहिली. साहजिकच याचा परिणाम काजू दरावर झाला.

कोकणाचे हक्काचे नगदी पीक राज्यात काजूचे सुमारे दोन लाख हेक्‍टर क्षेत्रावर उत्पादन घेतले जाते. यातून दीड लाख टन काजू मिळतात. कोकणामध्ये या पैकी १.७७ लाख हेक्‍टर क्षेत्रावर काजूचे पीक घेतले जाते. कोकण किनारपट्टीवरील पोषक उष्ण व दमट हवामान यामुळे काजूच्या बागांचे प्रमाण मोठे आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातच जवळ जवळ ८० हजार हेक्‍टर क्षेत्रावर काजू पीक घेतले जाते.

यंदाचा पाऊस पालवीला लाभदायक यंदा कोकणात योग्य प्रमाणात पाऊस झाला. यामुळे काजूला चांगली पालवी फुटली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तपमान बरेच खाली गेले. यामुळे पालवी फुटण्यास अडथळे निर्माण झाले. परंतु मोठे नुकसान होण्याच्या आतच पुन्हा अनुकूल हवामान निर्माण झाल्याने काजूच्या बागा पुन्हा मोहोरल्या. गेल्या पंधरवड्यात थंडीचे प्रमाण कमी झाल्याने काजू आता तयार होत आहेत. मध्यंतरीच्या थंडीमुळे व ढगाळ हवामानामुळे ढेकण्या रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी झाला असला तरी सध्याच्या चांगल्या वातावरणामुळे त्याचे नुकसान होणार नाही, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

Turmeric Processing : विडालय टरमरीक प्रोसेसींग क्‍लस्टरसाठी दहा कोटींची तरतूद

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

SCROLL FOR NEXT