भंडाऱ्यात धान खरेदीला मिळाली मुदतवाढ To buy grain in the storehouse Received extension 
मुख्य बातम्या

भंडाऱ्यात धान खरेदीला मिळाली मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

भंडारा : गोदाम आणि बारदाण्याच्या तुटवड्याने धान खरेदीवर परिणाम झाल्याने अनेक शेतकऱ्यांना धानाची हमीभावाने विक्री करता आली नाही. त्यातच मुदत संपल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आता शासनाने धान खरेदीला गुरुवारपर्यंत (ता.२२) मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  गोदामाच्या अभावामुळे खरीप हंगामातील धान खरेदी प्रभावीत झाली होती. त्यातच मिलर्सनी भरडाई दरात वाढीच्या मागणीसाठी भरडाई न करण्याचे जाहीर केले. परिणामी गेल्या खरिपातील धान गोदामातच पडून होते. याचा थेट परिणाम रब्बी हंगामातील धान खरेदीवर झाला. तब्बल वीस दिवस उशिराने धान खरेदी सुरू झाली. सुरुवातीला ३० जूनपर्यंत खरेदीची मुदत होती. परंतु धानाची संपूर्ण खरेदी झाली नाही. त्यामुळे १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या काळात बारदाण्याअभावी धान खरेदी ठप्प झाली. अनेक शेतकऱ्यांना आपला धान विकता आला नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती. आमदार डॉ. परिणय फुके यांनी या प्रश्‍नी सहकारमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेतली होती. धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, धान खरेदीला गुरुवारपर्यंत (ता. २२) वाढ देण्याचे आदेश शासनाने काढले आहेत.   नोंदणीकृत शेतकऱ्यांचाच धान होणार खरेदी  शासनाने विविध कारणांमुळे धान खरेदी रखडल्याच्या मुद्याची दखल घेत धान खरेदीला मुदतवाढ दिली आहे. मात्र नवीन शेतकऱ्यांची नोंदणी न करण्याचे या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. केवळ ३० जूनपर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचाच धान खरेदी करण्यात येणार आहे. उघड्यावर धानाचा साठा ठेवू नये, गोदामाच्या उपलब्धतेचा विचार करूनच ही खरेदी करण्यात यावी, असेही आदेशात नमूद आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT