corona
corona 
मुख्य बातम्या

प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बांधकामांना परवानगी 

टीम अॅग्रोवन

पुणे : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गेल्या सव्वा महिन्यापासून जिल्ह्यात टाळेबंदी आहे. यामुळे सर्व बांधकामे, पायाभूत सुविधांची कामे देखील बंद आहेत. परंतु आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या अर्धवट कामामुळे पूरस्थिती निर्माण होऊन एखादा धोका उद्भवू नये, यासाठी अतिबाधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी अर्धवट स्थितीतील बांधकामे पूर्ण करण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सशर्त परवानगी दिली आहे. 

प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह हवेली तालुक्यातील २७ ग्रामपंचायती हे जिल्हातील कोरोना प्रभावित क्षेत्र वगळता जिल्ह्याच्या उर्वरीत भागात बांधकामे सुरू होणार आहेत. पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये मॉन्सूनपूर्व कामे, तसेच टाळेबंदी पूर्वी अर्धवट राहिलेली बांधकामे सुरू करण्यास अटीसह परवानगी देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जोत्याचे बांधकाम, संरक्षण भिंतींचे बांधकाम, बेसमेंटचे बांधकाम, अपूर्ण अवस्थेतील प्लास्टर व प्लंबिंगची कामे करता येणार आहे.  ही परवानगी देताना अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. यात कामगारांची निवास आणि भोजनाची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी करणे, दररोज प्रत्येक कामगाराचे थर्मल स्कॅनिंग करणे, आठवड्यातून दोन वेळा सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करणे, कामगारांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळणे, कामाच्या ठिकाणी सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी परवानगी घेतलेल्या, अकृषक परवाना असलेल्या व अर्धवट स्थितीतील कामांनाच परवानगी देण्यात येणार आहे.  यासाठी संबंधित जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत, कँटोन्मेंट बोर्ड यांनी अतिबाधित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रांमध्ये प्रकरणनिहाय परवानगी देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश राम यांनी दिले आहेत. पुणे, पिंपरीचिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. स्थानिक प्रशासनाने हा भाग प्रतिबंधित केला असून, या भागात कोणत्याही अर्धवट बांधकामांना परवानगी देण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT