In the budget of Akola Zilla Parishad Provision of Rs. 97 lakhs for agriculture 
मुख्य बातम्या

अकोला जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात कृषीसाठी ९७ लाखांची तरतूद

अकोलाजिल्हा परिषदेचा सन २०२२-२३ या वर्षासाठी ३२ कोटी ४६ लाख ७८ हजार रुपयांचे अंदाजपत्रक बुधवारी (ता.२३) झालेल्या विशेष सभेत सादर करण्यात आले. यामध्ये कृषीसाठी सुमारे ९७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला ः जिल्हा परिषदेचा सन २०२२-२३ या वर्षासाठी ३२ कोटी ४६ लाख ७८ हजार रुपयांचे अंदाजपत्रक बुधवारी (ता.२३) झालेल्या विशेष सभेत सादर करण्यात आले. यामध्ये कृषीसाठी सुमारे ९७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. अर्थसंकल्पाचे वाचन मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांनी केले. अंदाजपत्रकात समाज कल्याण, पाणीपुरवठा, महिला व बाल कल्याण, सामान्य प्रशासन, शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन, आरोग्य व बांधकाम आदींसह विविध विभागांच्या योजनांसाठी तरतूद करण्यात आली. गतवर्षी पेक्षा ८० लाखांनी यंदाचा अर्थसंकल्प वाढला आहे. सभेला उपाध्यक्षा सावित्रीबाई राठोड, सभापती आकाश शिरसाट, सम्राट डोंगरदिवे, स्फूर्ती गावंडे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, सूरज गोहाड यांच्यासह सदस्य ज्ञानेश्‍वर सुलताने, गजानन पुंडकर, गोपाल दातकर, डॉ. प्रशांत अढाऊ, सुशांत बोर्डे पाटील, संजय अढाऊ, अनंत अवचार यांच्यासह इतर उपस्थित होते. 

कृषीसाठी ९७ लाखांची तरतूद  जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात कृषी विभागासाठी ९७ लाख ५७ हजाराची तरतूद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांना एचडीपीई पाइप देण्यासाठी २६ लाख, इलेक्ट्रिक पंप (ओपन वेल सबमर्सिबल पंप)-२५ लाख, प्लॅस्टिक ताडपत्री-३५ लाख, पॉवर स्प्रेअर-५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. तर शिक्षण विभागासाठी ७४ लाख ५७ हजार करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने जलशुद्धीकरण यंत्रासाठी ५ लाख, वॉटर कुलर १० लाख, आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी १ लाख, क्रीडा स्पर्धेसाठी ४ लाख, शाळांवर टीनपत्रे बसवण्यासाठी २ लाख, शाळांचे विद्युत देयक १० लाख, आवार भिंतीसाठी ५ लाख, शाळा दुरुस्तीसाठी १० लाख, प्रयोग शाळांना साहित्यासाठी ५ लाखाचा समावेश आहे. आरोग्य विभागासाठी ८६ ला‌ख ३३ हजाराची तरतूद करण्यात आली आहे. समाज कल्याण सर्वांत महत्त्वाच्या समाज कल्याण विभागासाठी ७ कोटी २४ लाख ३५ हजारांची तरदूत करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने ताडपत्री वितरण (गतवर्षीसह) ४५ लाख, दुधाळ जनावरे १ कोटी ७० लाख, लाभार्थ्यांना पीव्हीसी पाइप-१४ लाख, समाज मंदिर बांधकाम-४० लाख, लघुउद्योगासाठी डाळमिल देणे यासाठी ५० लाखांचा समावेश आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT