इथेनॉलनिर्मितीवर यंदा ब्राझीलचा अधिक भर
इथेनॉलनिर्मितीवर यंदा ब्राझीलचा अधिक भर 
मुख्य बातम्या

इथेनॉलनिर्मितीवर यंदा ब्राझीलचा अधिक भर

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली : ब्राझीलमधील  साखर उत्पादन यंदा तब्बल ५२.३ टक्क्यांनी घटले आहे. आतापर्यंत येथे ३ लाख ४० हजार टन साखर उत्पादन झाले आहे. मागील वर्षी याच काळात ७ लाख १३ हजार टन उत्पादन झाले होते. यंदा येथील कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीवर भर दिला आहे, अशी माहिती येथील शुगरकेन इंडस्ट्रीज असोसिएशनने दिली.   ब्राझील हा साखर उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. येथील साखर कारखान्यांनी १ ते १५ एप्रिलदरम्यान १३८.७ लाख टन उसाचे गाळप केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ टक्के गाळप घटले आहे. त्यामुळे ब्राझीलने यंदापासून इथेनॉलनिर्मितीवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होते. येथील गाळप हंगाम संपेपर्यंत अधिक प्रमाणात ऊस इथेनॉलनिर्मितीकडे वळण्याची शक्यता आहे. कच्च्या साखरेचे करार चढ्या दराने ब्राझील देशामध्ये कच्च्या साखरेचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे बाजारात करार करण्यासाठी ब्राझीलमधील निर्यातदारांना पसंती अधिक असते. गुरुवारी बाजारात जुलैसाठीचे कच्च्या साखरेचे करार पौंडसाठी १२.६९ सेंटवर झाले. परंतु, इथेनॉलकडे अधिक ऊस जात असल्याचे चित्र असल्याने येथील कच्च्या साखरेचा बाजार लगेच वधारला. सोमवारी कच्च्या साखरेचे दर गेल्या दोन महिन्यांतील उच्चांकी प्रतिपौंड १३.०५ सेंटवर पोचले. इथेनॉलसाठी अधिक ऊस ब्राझीलमध्ये पहिल्या पंधरा दिवसांत गाळप केलेल्या एकूण उसापैकी केवळ २३.५५ टक्के ऊस साखरनिर्मितीसाठी वापरण्यात आला आहे, तर तब्बल ७६.४५ टक्के ऊस इथेनॉलनिर्मितीसाठी वापरण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच काळात ३२ टक्के ऊस साखरनिर्मितीसाठी वापरण्यात आला होता. तसेच, इथेनॉलनिर्मिती ७३७ लाख लिटर झाली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT