केळी निर्यात
केळी निर्यात  
मुख्य बातम्या

ब्राह्मणपुरी बनतेय केळी निर्यातीचे केंद्र

टीम अॅग्रोवन

नंदुरबार ः केळीपट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रावेर पाठोपाठ खानदेशात नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा) हे केळी निर्यातीचे मोठे केंद्र म्हणून समोर येत आहे. या गावातील कमाल केळीची निर्यात या हंगामात होत असून, जवळपास सहा कंपन्या केळी निर्यातीसंबंधीचे काम करीत आहेत.  थेट शेतात स्वच्छता, प्रतवारी व बॉक्‍समध्ये केळीची पॅकिंग केली जाते. यानंतर केळी रेफर व्हॅन किंवा १५ मेट्रिक टन क्षमतेच्या मालवाहू वाहनातून मुंबई येथे पाठविली जाते. मुंबईतील प्री कूलिंग चेंबरमध्ये संबंधित खरेदीदार या केळीची साठवणूक करतात. तेथून जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून या केळीची निर्यात ओमान, इराण, बहरीन, दुबई, सौदी अरेबिया आदी आखाती देशांमध्ये केली जात आहे.  केळीची निर्यात ब्राह्मणपुरी व भागातून मागील महिनाभरापासून सुरू आहे. निर्यातक्षम केळी या भागात उपलब्ध आहे. कमाल शेतकरी उतिसंवर्धित व दर्जेदार केळी वाणांची लागवड या भागात करीत आहेत. ब्राह्मणपुरीसह खेडदिगर, सुलतानपूर, जवखेडा आदी गावांमधील केळीची निर्यात केली जात आहे. निर्यातीच्या केळीला १०० रुपये क्विंटलमागे जादा दर मिळत आहे, अशी माहिती मिळाली.  मागील हंगामात या गावात दोन कंपन्या केळी निर्यातीसंबंधीचे काम करीत होत्या. तर रोज दोन कंटेनर (एक कंटेनर २० मेट्रिक टन क्षमता) केळीची निर्यात व्हायची. परंतु, या हंगामात सहा कंपन्या काम करीत आहेत. त्यात देशातील आघाडीच्या केळी निर्याततार कंपन्यांचा समावेश आहे. किमान ४० ते ४२ कॅलीपर्सचा घेर व सात इंचपेक्षा अधिक लांबीची केळी या भागात उपलब्ध होत आहे. जलसाठे मुबलक असल्याने सिंचनासंबंधीदेखील चांगले व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केले आहे. ११०० ते १२५० रुपये प्रतिक्विंटलचे दर शेतकऱ्यांना जागेवरच निर्यातीच्या केळीसाठी मिळाले आहेत.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT