खैरगाव देशमुख (ता. पांढरकवडा) येथील शिवराज ढोले यांच्या कपाशीच्या फुलांमध्ये  गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला.
खैरगाव देशमुख (ता. पांढरकवडा) येथील शिवराज ढोले यांच्या कपाशीच्या फुलांमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. 
मुख्य बातम्या

यवतमाळमध्ये कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

यवतमाळ ः जिल्ह्यात गेल्यावर्षी मोठ्या क्षेत्रावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर यावर्षी हंगामाच्या सुरवातीलाच गुलाबी बोंड अळी दिसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. खैरगाव देशमुख (ता. पांढरकवडा) येथील शिवराज महादेव ढोले यांच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.  गेल्यावर्षीच्या हंगामात कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. या अळीच्या नियंत्रणासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी केली. शिफारशीत नसतानादेखील काही कीटकनाशक फवारण्यात आली. त्यानंतरदेखील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण शक्‍य झाले नाही. याउलट अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावे लागले. तब्बल २२ जणांचे मृत्यू बोंड अळीच्या नियंत्रणादरम्यान फवारणी करताना झाले होते. यावर्षी कृषी विभागाकडून जागृती करण्यात येत असली तरी हंगामाच्या सुरवातीलाच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या काही भागांत कपाशीचे पीक फुलावर आहे. फुलावर असलेल्या या पिकात अनेक ठिकाणी गुलाबी बोंड अळी दिसून आली.  कापसाचे हब पांढरकवडा आंधप्रदेशच्या सीमेवर असलेल्या पांढरकवडा तालुक्‍यात कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रावर होते. खैरगाव देशमुख येथील शिवराज ढोले यांनी ६ जूनला लागवड केली. १८ एकरावर त्यांचा कापूस आहे. यातील फुलधारणा झालेल्या कापसावर गुलाबी बोंड अळी त्यांना निरीक्षण करताना दिसून आली. हंगामाच्या सुरवातीलाच बोंड अळी दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कृषी विभाग अनभिज्ञ पांढरकवडा तालुक्‍यातील गावांमध्ये बोंड अळी दिसून आल्यानंतरदेखील कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाकडून या गावात जात, प्रादुर्भाव वाढू नये याकरिता जागृती तर दूरच साधी माहिती घेण्यासाठीदेखील कोणी भेट दिली नसल्याचे शिवराज ढोले यांनी सांगितले. त्यावरूनच संबंधित विभागाची उदासिनता दिसून येत असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT