वांगी
वांगी  
मुख्य बातम्या

अवैध बीटी वांग्याचा देशात शिरकाव

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली ः हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या शेतात बीटी वांग्याची लागवड आढळून आली आहे. केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेतील तपासणीत या शेतकऱ्याच्या शेतातील वांगी पिकामध्ये कीड नियंत्रणासाठी जनुकीय अभियांत्रिकी प्रक्रियेद्वारा ‘जीवाणू-प्रथिन’ घातले असल्याचे सिद्ध झाले आहे. जीएम-फ्री इंडिया संघटनच्या कार्यकर्त्यांनी ही बाब जनुकीय अभियांत्रिकी संमती समिती (जीईएसी) तसेच हरियाना सरकारच्या निदर्शनास आणून दिली.  खाद्य पिकांमध्ये जीएम वाणांना देशात परवानगी नाही. अशा वेळी हरियानातील जीएम वांग्याची लागवड अवैध ठरते. पर्यावरण संरक्षण कायद्याचे हे सरळसरळ उल्लंघन आहे. हरियाना सरकारने याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन जीएम-फ्री इंडिया संघटनेला दिले आहे. जीईएसीने २००९ मध्ये महिको या कंपनीने निर्माण केलेल्या बीटी वांग्याच्या प्रायोगिक लागवडीस मान्यता दिली होती. परंतु, तत्कालीन पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी २०१० मध्ये बीटी वांग्याच्या व्यावसायिक लागवडीचा निर्णय स्थगित ठेवला होता. बीटी वांग्याचा या देशातील जैवविविधता आणि मानवी आरोग्य यावर स्वतंत्रपणे अधिक अभ्यास व्हायला पाहिजे, असेही त्यांनी सुचविले होते.  बांगलादेशात बीटी वांग्याच्या लागवडीस परवानगी आहे. हरियाना राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बीटी वांग्याचा प्लॉट आहे त्यांनी मध्यस्थांच्या मार्फत रोपं खरेदी केली आहेत. त्यामुळे हरियाना-पंजाब या राज्यात बीटी वांग्याचे बियाणे-रोपे पुरविणारी मोठी यंत्रणा कार्यरत असल्याची शक्यताही जीएम-फ्री इंडियाच्या एका कार्यकर्त्यानी वर्तविली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT