Block BJP's way in the temple for daytime power supply to agricultural pumps
Block BJP's way in the temple for daytime power supply to agricultural pumps 
मुख्य बातम्या

कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी देवळ्यात भाजपचा रास्ता रोको

टीम अॅग्रोवन

देवळा, जि. नाशिक : शेतीकामांच्या दृष्टीने दिवसा वीजपुरवठा होणे महत्त्वाचे आहे. महावितरणने अन्यायकारक भारनियमन लादले आहे. ते रद्द करून कृषिपंपांना दिवसा वीज मिळेल, असे नवीन सुधारित वेळापत्रक करावे, या मागणीसाठी भाजपच्या वतीने शुक्रवारी (ता.४) पाच कंदीलजवळ ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. 

देवळा तालुक्यातील अनेक भागात सध्या कांदालागवड जोरात सुरू आहे. परंतु, महावितरण कंपनीने १ डिसेंबरपासून नवीन वेळापत्रक केल्याने शेतीच्या दृष्टीने ते चुकीचे आहे. दिवसा वीजपुरवठा व्हावा, असे नियोजन तातडीने व्हावे, अशी मागणी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या घोषणांचा निषेध करण्यात आला. चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. 

भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, सुनील देवरे, अण्णा शेवाळे, केदा शिरसाट, दादाजी बोरसे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. ‘हक्काची वीज दिवसा मिळालीच पाहिजे’, ‘वीजबिल माफी झालीच पाहिजे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. वायर व शॉक बल्ब दाखवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतुकीत व्यत्यय येऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

आंदोलनावेळी रुग्णवाहिका आल्याने तातडीने रस्ता खुला करून देण्यात आला. तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ, कार्यकारी अभियंता एस. पी. भोये, पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, पुंडलिक आहेर, भाऊसाहेब पगार, अशोक आहेर, दिलीप पाटील, दयाराम सावंत, शहराध्यक्ष अतुल पवार, कौतुक पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT