ग्लायफोसेटवरील बंदीने शेतीवर संकट ओढवेल ः ब्लेरो मॅग्गी
ग्लायफोसेटवरील बंदीने शेतीवर संकट ओढवेल ः ब्लेरो मॅग्गी 
मुख्य बातम्या

ग्लायफोसेटवरील बंदीने शेतीवर संकट ओढवेल ः ब्लेरो मॅग्गी

वृत्तसेवा

पाउलो, ब्राझील ः कॅलिफोर्निया न्यायालयाने ग्लायफोसेटच्या वापरामुळे कॅन्सर होतो, हे मान्य केल्यानंतर येथील न्यायालयानेही ग्लायफोसेटच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र ग्लायफोसेटवर बंदी घातल्यास ब्राझीलच्या कृषी क्षेत्रावर संकट ओढावेल, असे ब्राझीलचे कृषिमंत्री ब्लेरो मॅग्गी यांनी म्हटले आहे. ब्राझीलच्या न्यायालयाने तीन आॅगस्ट रोजी देशात येथून पुढे ग्लायफोसेटचा घटक असलेल्या उत्पादनाची नोंदणीच होणार नाही आणि जे अशा प्रकारचे उत्पादन सध्या वापरात आहेत, त्यांची मान्यता सप्टेंबरपासून रद्द करण्यात येणार आहे. आरोग्य विभाग जोपर्यंत यावर सुरक्षा उपाय काढत नाही तोपर्यंत ग्लायफोसेटवरील बंदी कायम राहील, असे आदेश दिले आहेत. याविषयी बोलताना कृषिमंत्री मॅग्गी म्हणाले, की ब्राझीलमध्ये तणनियंत्रणासाठी ९५ टक्के ग्लायफोसेटचा वापर केला जातो. सोयाबीन, मका आणि कापूस पिकातील तण नियंत्रणासाठी सरसकट ग्लायफोसेटचा वापर केला जातो. सध्या ग्लायफोसेटला कोणत्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नाही. ब्राझील हा जगातील महत्त्वाचा सोयाबीन आणि मका निर्यातदार देश आहे. ग्लायफोसेटच्या वापरमुळे तण नियंत्रण सोपे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. याला सध्या पर्यात काय आहे? ब्राझीलच्या महाधिवक्ता कार्यालयाने म्हटले आहे, की यासंबंधी कृषी विभागाच्या पाठिंब्यासह ही केस पुन्हा न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. ‘‘न्यायालयात सरकारचा दावा मान्य करून ग्लायफोसेटवरील बंदी मागे घेण्यात येईल,’’ असा विश्वास मॅग्गी यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT