भूज, गुजरात ः येथील प्रचार सभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करताना भाजपचे कार्यकर्ते.
भूज, गुजरात ः येथील प्रचार सभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करताना भाजपचे कार्यकर्ते. 
मुख्य बातम्या

गुजरातमध्ये भाजप १५१ जागा जिंकणार ः मोदी

वृत्तसेवा

भूज, गुजरात ः गुजरातमधील विधानसभेच्या १८२ जागांपैकी १५१ जागांवर भाजप विजय मिळवेल, असा अात्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. २७) व्यक्त केला अाहे. तसेच त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली अाहे.

‘‘ज्या वेळी डोकलामजवळील सीमेवर सैनिक सुरक्षेत व्यस्त होते, त्या वेळी राहुल गांधी यांनी चीनमधील राजदूतांची गळाभेट घेतली,’’ असे टीकास्त्र त्यांनी सोडले अाहे. कच्छमध्ये झालेल्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.

भाजपचा विकास अाणि काँग्रेसचे वंशवादी राजकारण या दोन्ही मुद्यांवरच गुजरातमधील निवडणुकीत स्पर्धा होईल, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले अाहे. जे अापल्या कुटुंबीयाशिवाय इतर कोणाचाही विचार करू शकत नाहीत; ते देशाच्या चांगल्याचा काय विचार करणार, असा टोलाही त्यांनी मारला अाहे.

विकास हाच अामचा मंत्र अाहे, असेही अाश्वासन त्यांनी या वेळी दिले. दरम्यान, गुजरातमध्ये २००२ मध्ये मोदी लाट होती. त्या वेळी भाजपने १२७ जागा जिंकल्या होत्या. अाता त्याहून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT