भाजपच्या आमदार, खासदारांना मोफत दूध देणार : अजित नवले
भाजपच्या आमदार, खासदारांना मोफत दूध देणार : अजित नवले 
मुख्य बातम्या

भाजपच्या आमदार, खासदारांना मोफत दूध देणार : अजित नवले

टीम अॅग्रोवन

मुंबई : भाजपचे आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींना ‘लुटता कशाला फुकटच न्या’ म्हणत दूध प्यायला खास आमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती शेतकरी नेते अजित नवले यांनी दिली. तहसील कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये व शहरातील प्रमुख चौकात दूधवाटप करण्याचे कार्यक्रम सर्व दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आले असून, ३ मे ते ९ मे या कालावधीत हे आंदोलन केले जाणार असल्याचे नवले यांनी सांगितले. सर्व पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते, नेते या आंदोलनात सहभागी होत आहेत. सात दिवस या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी रास्ता रोको, धरणे, मोर्चे व घेराव घालून आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे अजित नवले यांनी सांगितले आहे.  दुधाला सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रतिलिटर किमान २७ रुपये भाव द्या, या प्रमुख मागणीसाठी राज्यभर आंदोलनाला कालपासून सुरुवात करण्यात आली आहे. लुटता कशाला, फुकटच न्या, असे म्हणत दूध उत्पादकांनी मोफत दूधवाटप आंदोलन सुरू केले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. लुटणे थांबवा, शरम नसेल तर ‘फुकटच’ न्या, असे ग्रामसभांमध्ये ठराव करीत मोफत दूध पुरविण्याचा पवित्रा दूध उत्पादकांनी घेतला आहे. दिनांक ३ ते ९ मे या काळात राज्यभर चौकाचौकांत मोफत दूधवाटप सप्ताह आयोजित करण्यात येत आहेत. आंदोलनाच्या तयारीसाठी अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी व बीड जिल्ह्यात दूध उत्पादकांचे जिल्हाव्यापी मेळावे घेण्यात आले आहेत. या जिल्ह्यामध्ये मेळावे घेऊन फुकट दूधवाटप आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT