अशोक चव्हाण
अशोक चव्हाण 
मुख्य बातम्या

अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी आकडेवारी : अशोक चव्हाण

विजय गायकवाड

मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल मंगळवारी (ता. १७) जाहीर झाले. पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातही बहुतांशी ग्रामपंचायतींत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. पण सरकारचे अपयश लपविण्यासाठी खोटी आकडेवारी देऊन भाजपची फेकाफेकी सुरूच आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.  खासदार चव्हाण म्हणाले, की निकाल जाहीर झालेल्या बहुतांशी ग्रामपंचायतींत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या १०६३ आणि दुसरा टप्पा मिळून काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून खोटी आकडेवारी जाहीर करून आपलाचं पक्ष सर्वात मोठा असल्याचा खोटा दावा भाजपने या निवडणुकीच्या निकालानंतरही केला आहे. भाजपकडून माध्यमांना पुरवण्यात आलेल्या आकडेवारीत भाजपने अमरावती जिल्ह्यात १५० ग्रामपंचायतींत विजय मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात भाजपने फक्त ३६ तर काँग्रेस पक्षाने १४० ग्रामपंचायतींत विजय मिळविला आहे. ‘‘आतापर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ५२ पैकी २७, अमरावती जिल्ह्यात २४९ पैकी १४०, सांगली जिल्ह्यातील ४५२ पैकी १३९, पुणे जिल्ह्यातील २२१ पैकी ७७ ग्रामपंचायतींत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात ही भाजपचा दारुण पराभव झाला आहे. पण वस्तुस्थिती लपवण्यासाठी भाजपकडून खोटी आकडेवारी दिली जात आहे. दुसऱ्या टप्प्याच्या निकालाची सविस्तर आणि खरी आकडेवारी आम्ही लवकरच जाहीर करू असे सांगतानाच लोकांनी भाजपला दणका दिल्याने भाजपची फेकाफेकी सुरू आहे,’’ असा टोला खासदार चव्हाण यांनी लगावला.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT