Bank_Jalgaon_DCC_1.jpg
Bank_Jalgaon_DCC_1.jpg 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार 

टीम अॅग्रोवन

जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर भारतीय जनता पक्षाने बहिष्कार टाकला आहे. पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्यासह सर्व उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघारीच्या अंतिम दिवशी विविध कार्यकारी सोसायटीच्या १५ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत. चार विविध कार्यकारी सोसायटी व सहा राखीव मतदारसंघात लढत होत आहे. 

अर्ज माघार घेण्याची सोमवारी (ता. ८) अंतिम मुदत होती. भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. जामनेर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून आमदार गिरीश महाजन, तर जळगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदारसंघातून आमदार सुरेश भोळे यांनी माघार घेतली. पण भुसावळा सोसायटी मतदारसंघातून भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी माघार घेतलेली नाही. तर तांत्रिक कारणामुळे भुसावळातून माघार होवू शकली नाही, असे स्पष्टीकरण आमदार सुरेश भोळे यांनी दिले. 

बिनविरोध उमेदवार ः  जळगाव : जयश्री सुनील महाजन महापौर (शिवसेना), मुक्ताईनगर : एकनाथ खडसे (राष्ट्रवादी), चाळीसगाव : प्रदीप रामराव देशमुख (राष्ट्रवादी), पाचोरा : आमदार किशोर धनसिंग पाटील (शिवसेना), धरणगाव : संजय मुरलीधर पवार (राष्ट्रवादी), बोदवड : रवींद्र प्रल्हादराव पाटील (राष्ट्रवादी), भडगाव : प्रताप हरी पाटील, पारोळा : आमदार चिमणराव रूपचंद पाटील (शिवसेना), एरंडोल : अमोल चिमणराव पाटील (शिवसेना), जामनेर : नाना राजमल पाटील (राष्ट्रवादी), अमळनेर : आमदार अनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी). 

या मतदारसंघात होणार लढत 

  • विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघ : चोपडा- घनश्‍याम ओंकारदास अग्रवाल, सुरेश श्‍यामराव पाटील, संगीताबाई प्रदीप पाटील, भुसावळ-आमदार संजय वामन सावकारे, शांताराम पोपट धनगर, यावल-विनोदकुमार पंडितराव पाटील, प्रशांत लिलाधर चौधरी, गणेश गिरधर नेहते, रावेर-अरुण पांडुरंग पाटील, जनाबाई गोंडू महाजन, राजीव रघुनाथ पाटील,
  • विमुक्त जाती ः भटक्या जमाती- मेहताबसिंग रामसिंग नाईक, विकास ज्ञानेश्‍वर वाघ,
  • अनुसूचित जाती, जमाती ः श्‍यामकांत बळीराम सोनवणे, प्रकाश यशवंत सरदार, नामदेव भगवान बाविस्कर,
  • इतर मागास प्रवर्ग- विकास मुरलीधर पवार, डॉ. सतीश भास्करराव पाटील, प्रकाश जगन्नाथ पाटील, राजीव रघुनाथ पाटील,
  • महिला राखीव ः कल्पना शांताराम पाटील, अरुणा दिलीपराव पाटील, ॲड. रोहिणी खडसे खेवलकर, शैलजादेवी दिलीपराव निकम, शोभा प्रफुल्ल पाटील, सुलोचना भगवान पाटील,
  • इतर संस्था मतदारसंघ ः गुलाबराव बाबूराव देवकर, प्रकाश जगन्नाथ पाटील, प्रकाश यशवंत सरदार, उमाकांत रामराव पाटील, रवींद्र सूर्यभान पाटील. 
  • विश्‍वासघात, दडपशाहीचा निषेध : महाजन  भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला, याबाबत भाजप नेते आमदार गिरीश महाजन म्हणाले, की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला भाजपनेही सहमती दर्शविली होती. आमच्या बैठका झाल्या. मात्र ऐनवेळी तिन्ही पक्षांनी विश्‍वासघात केला व सर्वपक्षीय पॅनेलला नकार दिला. त्यानंतर अधिकाऱ्यावर दबाव आणून आमच्या उमेदवारांचे अर्ज बाद केले. नाशिक येथील अधिकाऱ्यांनीही आमचे ऐकले नाही. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT