poultry
poultry  
मुख्य बातम्या

राज्यात बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही 

टीम अॅग्रोवन

पुणे ः राज्यात वन्य व स्थलांतरित पक्ष्यांमध्ये, कावळ्यांमध्ये अथवा कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही अथवा या रोगामुळे मृत झाल्याचे देखील दिसून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुटपालक, अंडी व मांस खाणा-या मांसाहारी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. 

बर्ड फ्लु रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांमधील स्थलांतरित पक्षांमध्ये आढळून आला आहे. हिमाचल प्रदेश या राज्यातील कांगडा जिल्ह्यातील पाँग धरणाच्या परिसरात सायबेरीया आणि मंगोलीया या देशांमधून स्थलांतरित झालेल्या डोक्यावर दोन पट्या असणाऱ्या बदकांमध्ये मर्तूक आढळून आली आहे. ‘निशाद' (नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हायसिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस, भोपाळ) या राष्ट्रीय संस्थेने मर्तूकीसाठी बर्ड फ्लु रोगाचा H५N१ स्ट्रेन कारणीभूत असल्याचे निदान केले आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील वन विभागांद्वारे पानथळ जमीनी शेजारच्या भागामध्ये नमूद रोगाच्या सर्व्हेक्षणाचा मोठया प्रमाणात कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.  राजस्थान राज्यातील झालवाड आणि जोधपूर आणि मध्य प्रदेश राज्यातील इंदौर जिल्ह्यांमध्ये कावळ्यांमध्ये मर्तूक झाली असल्याचे देखील दिसून येते. ‘निशाद’ संस्थेद्वारे या मर्तूकीसाठी बर्ड फ्लु रोगाचा H५N८ स्ट्रेन कारणीभूत असल्याचे निदान करण्यात आले आहे.  राज्याच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लु सर्व्हेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने तसेच रक्तजल नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, पुणे या ५ राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या शिर्षस्थ प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात. सन २०२०-२१ मध्ये या संस्थेने राज्यातील एकूण १७१५ विष्ठा नमुने, १९१३ रक्तजल नमुने १५४९ घशातील द्रवांचे नमुन्यांची तपासणी आरटीपीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली आहे. तपासणीअंती वरील सर्व नमुने बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT