Big scandal in crop insurance company: Shetty 
मुख्य बातम्या

पीकविमा कंपनीत मोठे स्कॅंडल : शेट्टी

नांदेड : ‘‘पीकविमा कंपनीत खूप मोठे स्कॅंडल आहे. यात राज्य व केंद्रातील उच्च पदस्थांचा सहभाग आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार शेट्टी यांनी केला.

टीम अॅग्रोवन

नांदेड : ‘‘पीकविमा कंपनी दिवसाढवळ्या सरकारी तिजोरीसह शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारत आहे. शेतकरी, नागरिकांच्या समस्यांवरील लक्ष इतरत्र वळण्यासाठीच आर्यन खान, समीर वानखेडे प्रकरण प्रसारमाध्यमांना हाताशी धरून चालवले जात आहेत. पीकविमा कंपनीत खूप मोठे स्कॅंडल आहे. यात राज्य व केंद्रातील उच्च पदस्थांचा सहभाग आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार शेट्टी यांनी केला.

अर्धापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीला योग्य मोबदला मिळण्यासाठी शेट्टी यांनी पाठपुरावा केला होता. ते बुधवारी (ता. १०) नांदेड दौऱ्यावर आले होते. ‌ त्यांनी पार्डी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.  शेट्टी म्हणाले, ‘‘विमा कंपनी ‌‌‌‌‌‌‌‌ही शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही. पीककापणी पद्धत सदोष आहे. त्यामुळे उंबरठा उत्पन्न चुकीचे येते. या कंपनीत मोठा भ्रष्टाचार आहे. हे स्कॅंडल आहे. यात राज्यासह केंद्रातील उच्चपदस्थांचा समावेश आहे. या सोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चार टप्प्यांत एफआरपी देणे चुकीचे आहे. कारखानदार ऊस व‌ साखरेची चोरी करतात.’’ 

यावेळी संघटनेचे राज्यअध्यक्ष प्रकाश पोफळे, रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, हरिभाऊ कोंढेकर, किशनराव देळुबकर यांच्यासह सदाशिव देशमुख, गंगाधर देशमुख, विठ्ठल देशमुख, मारोती भांगे, दादाराव शिंदे, पंजाब देशमुख, शेकुराव हापगुंडे, हनुमंत देशमुख, नंदू देशमुख, अनिल देशमुख आदी उपस्थित होते.

  ‘महाविकास आघाडीबाबत फेरविचार करणार’

‘‘भाजपचे सरकार येऊ नये म्हणून आम्ही महाआघाडी सोबत गेलो. केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या व ‌‌‌‌‌‌नागरिकांच्या समस्यांना बगल देत आहे. या दोन्ही सरकारांवर दबाव आणून शेतकऱ्यांना ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यामुळे महाआघाडी सोबत राहण्याचा फेरविचार राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात येईल’’, असे शेट्टी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Innovation: ‘एचटीबीटी’ला मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा करा

Farmer Protest: कर्जमुक्त होईपर्यंत शेतकरी घर, शेतांवर लावणार काळे झेंडे

Karul Ghat Landslide: मुसळधारेमुळे करूळ घाटात दरड कोसळली

Farm Roads: शेतरस्ते, पाणंद रस्त्यांना मिळणार क्रमांक

Agro Processing Industry: कृषी प्रक्रिया उद्योग वाढविण्याची गरज: संचालक सतीश मराठे

SCROLL FOR NEXT