सिंचन प्रकल्प
सिंचन प्रकल्प 
मुख्य बातम्या

सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार कोटी : भानवाला

वृत्तसेवा

नवी दिल्ली ः देशातील सिंचन प्रकल्पांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत महत्त्वाच्या ९३ सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार ६३५ कोटी रुपयांची कर्जे उपलब्ध करून दिली आहेत. या निधीच्या माध्यमातून प्रकल्पांचा विकास करून सिंचन सुविधा वाढविण्याचा उद्देश आहे, असे ‘नाबार्ड’चे अध्यक्ष एच. के. भानवाला यांनी सांगितले.  देशातील ९९ सिंचन प्रकल्पांचा विकास करण्यासाठी ‘नाबार्ड’मार्फत दीर्घकालीन कर्जे उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात केंद्र आणि राज्यांच्या हिस्सा समाविष्ट असतो. हे प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी ७० हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ‘नाबार्ड’ त्यादृष्टीने कर्जे उपलब्ध करून देत आहे.   ‘‘ केंद्राने प्रस्तावित केलेले सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या आर्थिक सुविधा उपलब्ध आहेत. या कामात सध्या प्रगती आहे. राज्य सरकार त्यांच्या वाट्याचा निधी कधी उपलब्ध करून देते आणि केंद्रीय जल संसाधन मंत्रालयाची यामधील सक्रिय भूमिका, यावर हे प्रकल्प कधी पूर्ण होतील हे अवलंबून आहे. सध्या १८ प्रकल्प पूर्ण झाले असून सात प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हे सिंचन प्रकल्प राज्य सरकारांकडून पूर्ण करण्यात येत आहेत. अनेक प्रकल्पांसाठीचा केंद्राचा हिस्सा उपलब्ध झाला आहे. परंतु, राज्यांचा हिस्सा मिळण्यात वेळ लागत आहे. त्यामुळे काम पाहिजे त्या प्रमाणात प्रगतीपथावर नाही,’’ असेही भानवाला म्हणाले.  सर्वाधिक प्रकल्प उत्तर प्रदेशातील भानवाला म्हणाले, की निधी मिळालेले सर्वाधिक प्रकल्प उत्तर प्रदेशातील आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अर्थसंकल्पात सात हजार कोटींची तरतूद करणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात मोठे सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. केंद्राने मंजूर केलेले ९९ सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास देशातील जवळपास ८० लाख हेक्टरवरील क्षेत्रावर सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.  निधी उपलब्ध ‘नाबार्ड’ने ९९ पैकी ९३ सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार ६३४.९३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी ८६ प्रकल्पांसाठी जवळपास २३ हजार ४०२.७२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यामध्ये केंद्राचा हिस्सा १५ हजार २४२ कोटी रुपये आहे आणि राज्यांचा हिस्सा ८ हजार १६०.७० कोटी रुपये आहे. हे ९३ प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत, यासाठी हा निधी वेळेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT