वीज कोसळण्यापासून काळजी घ्या :सूर्यवंशी
वीज कोसळण्यापासून काळजी घ्या :सूर्यवंशी 
मुख्य बातम्या

वीज कोसळण्यापासून काळजी घ्या :सूर्यवंशी

टीम अॅग्रोवन

हिंगोली : ‘‘भारतीय हवामान विभागाने शनिवार (ता. ५) ते मंगळवार (ता. ८) ऑक्टोबर या कालावधीत मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजा कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी, नागरिकांनी काळजी घ्यावी’’, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले.

हे करू नका...

  •   पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. बाहेर असल्यास मोबाईल तत्काळ बंद करा.
  •  विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका.
  •  दोन चाकी, सायकलवर असल्यास तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा.
  •  धातूच्या काडीच्या छत्रीचा वापर टाळा.
  • विजा चमकतेवेळी हे करा

  •  आकाशात विजेचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी तत्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तत्काळ पाण्यातून बाहेर यावे.
  •  जवळ आसरा नसल्यास पायाखाली लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवा. डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा. डोके जमिनीवर टेकणार नाही, याची काळजी घ्या.
  •  झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहा.
  •  वीजवाहक वस्तूपासून दूर रहा, (उदा. विजेचे खांब, टेलिफोन खांब, लोखंडी पाइप) 
  •  वीज पडल्यास प्राथमिक उपचाराकरिता मुख्यत: हृदय व श्वसन प्रक्रियेत अडथळा येतो. त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्‍वास देण्यास मदत करावी.
  •  विजा चमकत असल्यास संगणक विद्युत उपकरणे बंद करून ठेवावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT