बेलगंगा कारखाना दिवाळीनंतर होणार सुरू
बेलगंगा कारखाना दिवाळीनंतर होणार सुरू 
मुख्य बातम्या

बेलगंगा कारखाना दिवाळीनंतर होणार सुरू

टीम अॅग्रोवन

चाळीसगाव, जि. जळगाव ः बेलगंगा सहकारी साखर कारखान्यात बुधवारी (ता. १४) अंबाजी कंपनीतर्फे ‘मिल रोलर’ पूजन करून दुरुस्ती कामाचा प्रारंभ करण्यात आला. कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने विविध विभागातील यंत्रसामग्रीच्या दुरुस्ती कामाला वेग आला आहे. त्यामुळे ऑक्‍टोबरमध्ये कारखाना गळीत हंगाम काढण्यासाठी सज्ज होईल, असा विश्‍वास अंबाजी ग्रुपने व्यक्त केला.

जिल्हा बॅंकेकडून लिलाव प्रक्रियेद्वारे अंबाजी ग्रुपने कारखाना विकत घेतल्यानंतर येणाऱ्या विविध अडचणींना तोंड देत, कारखान्यात मशिनरी दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी ज्येष्ठ व अनुभवी तज्ज्ञांची नियुक्ती कंपनीने केली आहे. याशिवाय कारखान्यात यापूर्वी काम केलेल्या काही कामगारांनाही पुन्हा घेतले आहे.

कारखाना जिल्हा बॅंकेने ताब्यात घेतल्यानंतर तो बंदच होता. त्यामुळे आतील यंत्रसामग्री पडून राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खराब झालेली आहे. त्यामुळे अंबाजी कंपनीने मुख्य अभियंता म्हणून अर्जुन शिंदे, मुख्य रसायनशास्त्रज्ञपदी अशोक मेमाणे यांची, तर शेतकी अधिकारी म्हणून सुभाष भाकरे यांची नियुक्‍ती केली आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या दुरुस्तीला सुरवात झाली आहे. पूजनप्रसंगी चित्रसेन पाटील, केदारसिंग पाटील, प्रवीण पटेल, दिलीप चौधरी, विजय अग्रवाल, किरण देशमुख, नीलेश निकम, प्रेमचंद खिवसरा, डॉ. मुकुंद करंबेळकर, डॉ. अभिजित पाटील, अजय शुक्‍ल, जगदीश पाटील, उद्धवराव महाजन, शरद मोराणकर, श्री. ब्राह्मणकार यांच्यासह कंपनीचे संचालक व शेतकरी उपस्थित होते.

सुपारी देऊन केली मोडतोड हा कारखाना कुठल्याही परिस्थिती सुरू होऊ नये, यासाठी अक्षरशः सुपारी देऊन कारखान्यातील यंत्रसामग्रीची मोडतोड केल्याचा आरोप चित्रसेन पाटील यांनी केला. कारखान्यात दीड व अडीच किलो मेगावॉटचे दोन टर्बाइन असून विक्रीची निविदा निघताच माहितीगार व्यक्‍तीने या टर्बाइनमधील वायडिंग कापले. पुन्हा वायडिंगसाठी लाखो रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे हेतू पुरस्सर केलेले हे कृत्य केले, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

४ लाख टन होणार गाळप कारखान्यातील सध्याची यंत्रसामग्रीची दुरुस्त करून काही नवीन साहित्य आणल्यानंतर पाच महिन्यांत कारखान्याकडून जवळपास ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केला जाईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. कारखान्यात ६० टनांचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजनकाटे बसविण्यात येणार आहेत. कारखान्यातील ७० टनांची क्षमता असलेल्या तीन बॉयलरचीही दुरुस्ती झाली. आज विधिवत पूजन करून ‘रोलर’ यंत्रावर बसविण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT