पुणे जिल्ह्यातील तूर खरेदीसाठी बारामतीत केंद्र
पुणे जिल्ह्यातील तूर खरेदीसाठी बारामतीत केंद्र 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यातील तूर खरेदीसाठी बारामतीत केंद्र

टीम अॅग्रोवन

पुणे  : जिल्ह्यातील तूर खरेदीसाठी बारामतीमध्ये केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तुरीच्या हेक्टरी उत्पादकतेनुसार शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त प्रति एकरी १९६ किलो तूर खेरदी करण्यात येणार आहे. बारामती येथील नीरा कॅनॉल खरेदी-विक्री संघाला तूर खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांनी १४ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  यापूर्वी एका शेतकऱ्याच्या नावावर २५ क्विंटल तूर खरेदी केली जात होती. त्यासाठी प्रतिक्विंटल ५७५० रुपयांचा दर देण्यात आला होता. मात्र यंदा जिल्ह्याच्या हेक्टरी तूर उत्पादकतेनुसार एका शेतकऱ्याच्या नावावर एकरी १९६ किलो (हेक्टरी ४९१ किलो) तूर खरेदी होणार आहे. राज्य सरकारकडून अद्याप खरेदीचे दर निश्चित झाले नसून, खरेदीच्या सूचना आलेल्या नाहीत. मात्र तूर खरेदीसाठी १४ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नावनोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे 

  •  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा, आधार कार्ड छायांकित प्रत
  • आधार लिंक असलेल्या बॅंक खात्याचे पासबुक 
  • सातबारावर २०१९ मध्ये तूर लागवड केल्याची नोंद आवश्यक
  • नावनोंदणीसाठी संपर्क : प्रशांत मदणे- ८८८८८६७९२५  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT