Bans on donating blood to foreign returns persons
Bans on donating blood to foreign returns persons 
मुख्य बातम्या

विदेशातून आलेल्या नागरिकांना रक्तदानास बंदी  

टीम अॅग्रोवन

नगर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रक्तदान करण्यास परवानगी असली, तरी गर्दी टाळण्याच्या हेतूने केवळ पाच रक्तदात्यांना रक्तपेढीत प्रवेशाला परवानगी आहे. त्याचबरोबर विदेशातून आलेल्या नागरिकांना रक्तदान करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ‘कोरोना’चा प्रसार वाढण्याची शक्‍यता आहे. आदेशात म्हटले आहे की, रक्तदात्यांनी केवळ रक्तपेढीतच रक्तदान करावे. रक्तपेढीमध्ये केवळ पाच रक्तदात्यांना प्रवेश असणार आहे. रक्तदात्याला मागील तीन आठवड्यांत कुठल्याही प्रकारे संक्रमण झालेले नसावे. रक्तदानापूर्वी रक्तदात्यांनी अल्पोपाहार घेतलेला असावा. रक्तदात्याचे वय १८ ते ६०च्या दरम्यान असावे. मागील रक्तदानापासूनचा कालावधी तीन महिन्यांपेक्षा अधिक असावा. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ पेक्षा कमी नसावे. रक्तदान शिबिर आयोजकांनी रक्तदात्यांची यादी नाव, मोबाईल क्रमांकासह सादर करणे गरजेचे आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी म्हणून रक्तदात्यांनी चेहऱ्यावर मास्क लावून येणे बंधनकारक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

SCROLL FOR NEXT